Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 105

117 Mantra
12/105
Devata- विद्वान् देवता Rishi- हिरण्यगर्भ ऋषिः Chhand- विराट्त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
इष॒मूर्ज॑म॒हमि॒तऽआद॑मृ॒तस्य॒ योनिं॑ महि॒षस्य॒ धारा॑म्। आ मा॒ गोषु॑ विश॒त्वा त॒नुषु॒ जहा॑मि से॒दिमनि॑रा॒ममी॑वाम्॥१०५॥

इष॑म्। ऊर्ज॑म्। अ॒हम्। इ॒तः। आद॑म्। ऋ॒तस्य॑। योनि॑म्। म॒हि॒षस्य॑। धारा॑म्। आ। मा॒। गोषु॑। वि॒श॒तु॒। आ। त॒नूषु॑। जहा॑मि। से॒दिम्। अनि॑राम् अमी॑वाम् ॥१०५ ॥

Mantra without Swara
इषमूर्जमहमितऽआदमृतस्य योनिम्महिषस्य धाराम् । आ मा गोषु विशत्वा तनूषु जहामि सेदिमनिराममीवाम् ॥

इषम्। ऊर्जम्। अहम्। इतः। आदम्। ऋतस्य। योनिम्। महिषस्य। धाराम्। आ। मा। गोषु। विशतु। आ। तनूषु। जहामि। सेदिम्। अनिराम् अमीवाम्॥१०५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (एक याज्ञिक मनुष्य अथवा अग्नि-विद्यावित्‌ मनुष्य म्हणत आहे) हे मनुष्यांनो (माझ्या बंधूंनो) जसे मी (एक याज्ञिक वा वैज्ञानिक) (इत:) पूर्ववर्णित विद्युतेच्या (आदम्‌) कुशल व उपयोगाने (इवम्‌) अन्न-धान्य आणि (उर्ज्जम्‌) शक्ती-पराक्रम प्राप्त करतो आणि (महिषस्थ) महान (ऋतस्य) सत्याचे जे (योनिम्‌) कारण त्या (धाराम्‌) वाणीला प्राप्त करतो (अग्नीपासून प्रेरणा घेऊन सत्याचा शोध करतो) (त्याप्रमाणे तुम्ही सर्वजण देखील करा) तसेच या अग्नीच्या साहाय्याने ज्याप्रमाणे अन्न आणि पराक्रम (मा) माझ्यात (आविशतु) प्रविष्ट व्हावेत (तसे तुमच्या शरीर व मनात प्रविष्ट व्हावेत) माझ्या (गोषु) इंद्रियांत आणि (तनूष) शरीरात प्रविष्ट जालेल्या (सेदिम्‌) पीडावेदनेचे कारण असलेल्या की (अनिराम्‌) ज्या पीडेमुळे मला जेवणदेखील करता येत नाही, अशा (अमीवाम्‌) दुर्धर रोगांमुळे उत्पन्न होणाऱ्या वेदनेला मी (आ जहामि) सोडतो, दूर करतो, त्याप्रमाणे तुम्ही देखील करा (अग्निविद्येमुळे रोगनिवारण करण्यास शिका ॥105॥
Essence
भावार्थ - मनुष्यांकरिता हे हितकर आहे की त्यांनी अग्नीमधे जे शक्ति-ऊर्जा देण्याचे गुण आहे, त्याद्वारे रोगांचा नाश करावा. इंद्रिये आणि शरीर, यांना स्वस्थ व रोगरहित करून कार्य कारण विवेचन करण्यास समर्थ अशी विद्युयुक्तवाणी प्राप्त करावी आणि आपला आहार-विहार योग्य ठेवावा ॥105॥
Subject
आता पुढील मंत्रात उचित आहार-विहार विषयी सांगितले आहे -