Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 103

117 Mantra
12/103
Devata- अग्निर्देवता Rishi- हिरण्यगर्भ ऋषिः Chhand- निचृदुष्णिक् Swara- ऋषभः
Mantra with Swara
अ॒भ्याव॑र्त्तस्व पृथिवि य॒ज्ञेन॒ पय॑सा स॒ह। व॒पां ते॑ऽअ॒ग्निरि॑षि॒तोऽअ॑रोहत्॥१०३॥

अ॒भि। आ। व॒र्त्त॒स्व॒। पृ॒थि॒वि॒। य॒ज्ञेन॑। पय॑सा। स॒ह। व॒पाम्। ते॒। अ॒ग्निः। इ॒षि॒तः। अ॒रो॒ह॒त् ॥१०३ ॥

Mantra without Swara
अभ्या वर्तस्व पृथिवि यज्ञेन पयसा सह । वपाम्तेऽअग्निरिषितो अरोहत् ॥

अभि। आ। वर्त्तस्व। पृथिवि। यज्ञेन। पयसा। सह। वपाम्। ते। अग्निः। इषितः। अरोहत्॥१०३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्या, ही जी (पृथिवि) भूमी (यज्ञेन) संगमनीय म्हणजे प्रवाहित होणाऱ्या (पयसा) जला (सह) सह विद्यमान आहे, तिच्याशी दोन्ही प्रकारे म्हणजे (भूमी आणि जलाचा योग्य उपयोग करीत) लाभ घेत जा. (ते) तुझ्या (वयाम्‌) कृषीसाठी बी पेरता यावे याकरिता (इषित:) विशेष रुपाने दिलेला हा (अग्नि:) अग्नी (अरोहत्‌) त्या बी-बियाण्यांना उत्पन्न करतो (जल आणि अग्निच्या साहाय्याने बी-उगवतात) तू त्या अग्नीच्या गुण, कर्म आणि स्वभाव यांना पूर्णत: जाणून घे आणि इतर सर्वांनीही जाणून घ्यावे. ॥103॥
Essence
भावार्थ - जी भूमी सर्वांचा आधार आहे, जी उत्तम इत्यादी पदार्थ आम्हांस देते, जी जीवनाचे कारण असून विद्युतयुक्त आहे, सर्व मनुष्यांनी त्या भूमीचे विज्ञान, भूगर्भ विद्या आदीचा अधिकाधिक विकास करावा ॥103॥
Subject
पृथ्वीवरील पदार्थांचे विज्ञान कसे जाणावे (वाप्राप्त करावे) याविषयी पुढील मंत्रात सांगितले आहे -