Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 11 / Mantra 83

83 Mantra
11/83
Devata- यजमानपुरोहितौ देवते Rishi- नाभानेदिष्ठ ऋषिः Chhand- उपरिष्टाद् बृहती Swara- मध्यमः
Mantra with Swara
अन्न॑प॒तेऽन्न॑स्य नो देह्यनमी॒वस्य॑ शु॒ष्मिणः॑। प्रप्र॑ दा॒तारं॑ तारिष॒ऽऊर्जं॑ नो धेहि द्वि॒पदे॒ चतु॑ष्पदे॥८३॥

अन्न॑पत॒ इत्यन्न॑ऽपते। अन्न॑स्य। नः॒। दे॒हि॒। अ॒न॒मी॒वस्य॑। शु॒ष्मिणः॑। प्र॒प्रेति॒ प्रऽप्र॑। दा॒तार॑म्। ता॒रि॒षः॒। ऊर्ज॑म्। नः॒। धे॒हि॒। द्वि॒पद॒ इति॑ द्वि॒ऽपदे॑। चतु॑ष्पदे। चतुः॑ऽपद॒ इति॒ चतुः॑ऽपदे ॥८३ ॥

Mantra without Swara
अन्नपतेन्नस्य नो देह्यनमीवस्य शुष्मिणः । प्रप्र दातारन्तारिषऽऊर्जन्नो धेहि द्विपदे चतुष्पदे ॥

अन्नपत इत्यन्नऽपते। अन्नस्य। नः। देहि। अनमीवस्य। शुष्मिणः। प्रप्रेति प्रऽप्र। दातारम्। तारिषः। ऊर्जम्। नः। धेहि। द्विपद इति द्विऽपदे। चतुष्पदे। चतुःऽपद इति चतुःऽपदे॥८३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (अन्नपते) औषधी आदी अन्नांचे पालक हे यजमान, अथवा हे पुरोहित, तुम्ही (न:) आमच्यासाठी वा आम्हाला (अनमीवस्य) रोगनाशक आणि सुखकारक तसेच (शुष्मिरण:) अत्यंत बलदायक असे (अन्नस्य) अन्न (प्रप्रदेहि) भरपूर प्रमाणात द्या. तसेच तुम्ही आम्हास हे अन्न (दातारम्) देणार्‍या (कृषक, पाचक आदींना) (तारिष:) आनंदित व संतुष्ट ठेवा. तसेच (न:) आमच्या (द्विपदे) दोन पाय असलेल्या मनुष्यादींना (घरातील सर्व व्यक्तींना) आणि चतुष्पदे) चार पाय असणार्‍या म्हणजे आमच्या पशुधनाला (ऊर्जम्) शक्ती वा पराक्रम (धेहि) द्या. (त्यांना नीरोग आणि सशक्त ठेवा) ॥83॥
Essence
भावार्थ - मनुष्यांनी नेहमी बलदायक आणि आरोग्य दायक अन्नाचे स्वत: सेवन करावे आणि इतरानाही द्यावे. आपल्या घरातील वा सर्वच मनुष्यांच्या आणि पशूंच्या सुखाकरिता व शक्तीसाठी झटावे. याप्रकारे परमेश्वराच्या सृष्टीतील अनुकुल क्रमाने आचरण केल्यास सर्वांच्या सुखात वृद्धी होईल. ॥83॥
Subject
माणसांनी या जगात कशाप्रकारे वागावे, पुढील मंत्रात हा विषय कथित आहे -
Footnote
इथे यजुर्वेदभाष्यातील अकरावा अध्याय समाप्त ॥11॥