Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 11 / Mantra 79

83 Mantra
11/79
Devata- सेनापतिर्देवता Rishi- नाभानेदिष्ठ ऋषिः Chhand- निचृदनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
ये जने॑षु म॒लिम्ल॑व स्ते॒नास॒स्तस्क॑रा॒ वने॑। ये कक्षे॑ष्वघा॒यव॒स्ताँस्ते॑ दधामि॒ जम्भ॑योः॥७९॥

ये। जने॑षु। म॒लिम्ल॑वः। स्ते॒नासः॑। तस्क॑राः। वने॑। ये। कक्षे॑षु। अ॒घा॒यवः॑। अ॒घ॒यव॒ इत्य॑घ॒ऽयवः॑। तान्। ते॒। द॒धा॒मि॒। जम्भ॑योः ॥७९ ॥

Mantra without Swara
ये जनेषु मलिम्लव स्तेनासस्तस्करा वने । ये कक्षेष्वघायवस्ताँस्ते दधामि जम्भयोः ॥

ये। जनेषु। मलिम्लवः। स्तेनासः। तस्कराः। वने। ये। कक्षेषु। अघायवः। अघयव इत्यघऽयवः। तान्। ते। दधामि। जम्भयोः॥७९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे सभापती, (राष्ट्राध्यक्ष), (जनेषु) माणसामधे (समाजात) (ये) जे (मलिम्लव:) मलीनचित व मलिन कर्म करणारे लोक येतात जातात, तसेच जे (स्तेनास:) चोर, आणि (वने) वनात (तस्करा:) लुटारु वा दरोडेखोड लपलेले असतात आणि जे (कक्षेषु) सीमावर्ती प्रदेशात वा जवळपास राहत (अद्यायव:) पाप करीत जीवन जगतात, (तान्ट) त्या दुष्टजनांना मी सेनाध्यक्ष (ते) आपल्या (जम्भयो:) उघडलेल्या मुखामध्ये जसे अन्नाचा घास ठेवतात, त्याप्रमाणे त्या दुष्टांना (ते) आपल्या निर्णयासाठी आपल्यासमोर (दधामि) पकडून आणून ठेवतो (आपण त्यांना योग्य ते शासन करा) ॥79॥
Essence
भावार्थ - सेनापती आदी राजपुरुषांचे मुख्य कर्तव्य आहे की गावात वा वनात जे चोर, लुटारू आदी पापी लोक असतात, त्यांना पकडून राजाच्या स्वाधीन करावे. ॥79॥
Subject
राजपुरुषांनी आणखी कोणाकोणावर नियंत्रण ठेवावे वा त्यांचे निवारण करावे, याविषयी पुढील मंत्रात प्रतिपादन केले आहे -