Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 11 / Mantra 78

83 Mantra
11/78
Devata- अग्निर्देवता Rishi- नाभानेदिष्ठ ऋषिः Chhand- भुरिगुष्णिक् Swara- ऋषभः
Mantra with Swara
दꣳष्ट्रा॑भ्यां म॒लिम्लू॒ञ्जम्भ्यै॒स्तस्क॑राँ२ऽउ॒त। हनु॑भ्या॒ स्ते॒नान् भ॑गव॒स्ताँस्त्वं खा॑द॒ सुखा॑दितान्॥७८॥

दꣳष्ट्रा॑भ्याम्। म॒लिम्लू॑न्। जम्भ्यैः॑। तस्क॑रान्। उ॒त। हनु॑भ्या॒मिति॒ हनु॑ऽभ्याम्। स्ते॒नान्। भ॒ग॒व॒ इति॑ भगऽवः। तान्। त्वम्। खा॒द॒। सुखा॑दिता॒निति॒ सुऽखा॑दितान् ॥७८ ॥

Mantra without Swara
दँष्ट्राभ्याम्मलिम्लून्जम्भ्यैस्तस्कराँ उत । हनुभ्याँ स्तेनान्भगवस्ताँस्त्वङ्खाद सुखादितान् ॥

दꣳष्ट्राभ्याम्। मलिम्लून्। जम्भ्यैः। तस्करान्। उत। हनुभ्यामिति हनुऽभ्याम्। स्तेनान्। भगव इति भगऽवः। तान्। त्वम्। खाद। सुखादितानिति सुऽखादितान्॥७८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (भगव:) सभा व सेनेच्या ऐश्वर्यवान स्वामी, (त्वम्) आपण (जंभ्वै:) मुखातील जिव्हा आदी अवयवांनी आणि (दंष्यभ्याम्) तीक्ष्ण दातांनी (मलिम्लून्) हीन आचरण (हिंसा, आक्रमण आदी कृत्य) करणार्‍या सिंह आदी पशूंना आणि (हनुभ्याम्) मसूडे आणि हनुवटी आदी अवयवांनी (तस्करान्) चोराप्रमाणे वागणार्‍या (सुखादिलान्) तसेच अन्यायाने दुसर्‍याचे पदार्थ हिसकावून घेणार्‍या लोकांना (लुटारू, दरोडेखोरांना) तसेच (स्तेनान्) रात्रीच्या अंधारात लोकांच्या घरातील भिंती फोडून त्यांचे साहित्य पळविणार्‍या लोकांना (खाद) समूळ नष्ट करता, त्याप्रकारे (तान्) त्या दुष्ट चोर, तस्करादींना आम्ही (सर्व प्रजाजन) (उत) देखील नष्ट करू (चोर, तस्कर, दरोडेखोराचे उपद्रव शांत करण्यात राजास सहकार्य करू) ॥78॥
Essence
भावार्थ - राजपुरुषांचे कर्तव्य आहे की गौ आदी उपकारक पशूंना मारणार्‍या सिंह आदी प्राण्यांना अथवा मनुष्यांना, तसेच जे चार आदी मनुष्य आहेत, त्यांना नाना प्रकारच्या बंधनाने बांधावे, (त्यांवर नियंत्रण आणावे) अथवा त्यांचे वध करून वश आणावे. ॥78॥
Subject
दुष्टजनांना आणखी कोणत्याप्रकारे शिक्षा द्यावी, याविषयी पुढील मंत्रात सांगितले आहे -