Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 11 / Mantra 75

83 Mantra
11/75
Devata- अग्निर्देवता Rishi- नाभानेदिष्ठ ऋषिः Chhand- विराट् त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
अह॑रह॒रप्र॑यावं॒ भर॒न्तोऽश्वा॑येव॒ तिष्ठ॑ते घा॒सम॑स्मै। रा॒यस्पोषे॑ण॒ समि॒षा मद॒न्तोऽग्ने॒ मा ते॒ प्रति॑वेशा रिषाम॥७५॥

अह॑रह॒रित्यहः॑ऽअहः। अप्र॑याव॒मित्यप्र॑ऽयावम्। भर॑न्तः। अश्वा॑ये॒वेत्यश्वा॑यऽइव। तिष्ठ॑ते। घा॒सम्। अ॒स्मै॒। रा॒यः। पोषे॑ण। सम्। इ॒षा। मद॑न्तः। अग्ने॑। मा। ते॒। प्रति॑वेशा॒ इति॒ प्रति॑ऽवेशाः। रि॒षा॒म॒ ॥७५ ॥

Mantra without Swara
अहर्हरप्रयावम्भरन्तो श्वायेव तिष्ठते घासमस्मै । रायस्पोषेण समिषा मदन्तो ग्ने मा ते प्रतिवेशा रिषाम ॥

अहरहरित्यहःऽअहः। अप्रयावमित्यप्रऽयावम्। भरन्तः। अश्वायेवेत्यश्वायऽइव। तिष्ठते। घासम्। अस्मै। रायः। पोषेण। सम्। इषा। मदन्तः। अग्ने। मा। ते। प्रतिवेशा इति प्रतिऽवेशाः। रिषाम॥७५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (अग्ने) विद्वान पुरुष, (अहरह:) नित्यप्रति (तिष्ठते) विद्यमान वा घराचा (अश्वायेव) घोड्यासाठी लोग गवत आदी खाण्याचे पदार्थ त्याच्यासमोर धरतात (घोड्याला घास चारतात) त्याप्रमाणे (अस्मै) या गहस्थासाठी आम्ही (अन्य गृहस्थजन) (अप्रयावम्) अन्यायापासून दूर असलेल्या (न्यायपूर्ण अशा या व्यक्तीच्या) गृहाश्रमाकरिता (घासम्) ‘उपभोग घेण्यास योग्य असे पदार्थ (भरन्त:) धारण करतो वा देतो (आम्ही गृहस्थजन एखाद्या गृहस्थाश्रमाची दुरावस्था वा अभावदशा पाहून त्यास साहाय्य करतो) हे गृहस्था, (राय:) धनाच्या (पोषेण) समृद्धीद्वारे आणि (इषा) अन्य आदी वस्तूद्वारे (संमदन्त:) स्वत: आनंद उपभोगत (प्रतिवेशा:) धर्माविषयीच्या भावनेने आम्ही (ते) तुझ्या समृद्धीला कधी (मारिषाम) नष्ट होऊ देणार नाही. (अभावग्रस्ताला कधी काही कमी पडू देणार नाही, सदैव मदत करू) (अथवा एखाद्या श्रीमंत पण न्यायी गृहस्थाच्या संपत्तीविषयी ईर्षा-द्वेष बाळगून त्याची हानि करणार नाही) ॥75॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा अलंकार आहे. गृहस्थजनांना उचित आहे की, जसे घोडे आदी पशुंसाठी (गवत) आणि दूध आदी पदार्थांसाठी गोपालकजन नित्य (गवत, चारा व खाद्य पदार्थ) जमा करतात, त्याप्रमाणे गृहस्थांनी आपल्या घरातील ऐश्वर्य वाढवावे. पण कधीही आपल्या धनामुळे अहंकारग्रस्त होऊन इतरांशी ईर्ष्या-द्वेष करू नये. एवढेच नाही तर अन्यजनांची प्रगती, उन्नत्ती पाहून वा धन-ऐश्वर्य पाहून नेहमी आनंदित असावे. ॥75॥
Subject
यानंतर गृहाश्रमीजनांनी कसे आचरण करावे, याविषयी पुढच्या मंत्रात कथन केले आहे -