Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 11 / Mantra 73

83 Mantra
11/73
Devata- अग्निर्देवता Rishi- जमदग्निर्ऋषिः Chhand- निचृदनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
यद॑ग्ने॒ कानि॒ कानि॑ चि॒दा ते॒ दारू॑णि द॒ध्मसि॑। सर्वं॒ तद॑स्तु ते घृ॒तं तज्जु॑षस्व यविष्ठ्य॥७३॥

यत्। अ॒ग्ने॒। कानि॑। कानि॑। चि॒त्। आ। ते॒। दारु॑णि। द॒ध्मसि॑। सर्व॑म्। तत्। अ॒स्तु॒। ते॒। घृ॒तम्। तत्। जु॒ष॒स्व॒। य॒वि॒ष्ठ्य॒ ॥७३ ॥

Mantra without Swara
यदग्ने कानि कानि चिदा ते दारूणि दध्मसि । सर्वन्तदस्तु ते घृतन्तज्जुषस्व यविष्ठ्य ॥

यत्। अग्ने। कानि। कानि। चित्। आ। ते। दारुणि। दध्मसि। सर्वम्। तत्। अस्तु। ते। घृतम्। तत्। जुषस्व। यविष्ठ्य॥७३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (संबंधीजन म्हणतात) हे (यविष्ट्य) पूर्ण युवावस्थाप्राप्त आणि (अग्ने) अग्नीप्रमाणे तेजस्वी विद्वान पुरुष (पती) अथवा हे स्त्री (पत्नी) (कानिकानिचित्) ज्या काही वस्तू (ते) तुझ्या आहेत, त्यांना आम्ही (नातेवाईक) (दारूणि) या काष्टपात्रात (दध्मसि) धारण करतो (तू आम्हास गरजेनुसार जे काही पदार्थ स्वेच्छेने देतोस, त्याचा आम्ही प्रेमाने स्वीकार करतो) सर्व (ते) तुझ्यासाठी (अस्तु) असोत जे आमचे (धृतम्) धृत आदी उत्तम पदार्थ आहेत, त्यांचे (जुषरच सेवन कर.) गृहस्थांनी संकटकाळी वा आवश्यकतेप्रमाणे एकमेकास आदान-प्रदान व सहकार्य करीत रहावे) जे काही तुझे पदार्थ आहेत, ते सर्व आमचे (आमच्यासाठी) असोत व जे तुझे धृत आदी पदार्थ आहेत, त्याचे आम्ही ग्रहण करू ॥73॥
Essence
भावार्थ - ब्रह्मचारी आदी (गृहस्थजन) मनुष्यांनी आपले सर्व पदार्थ सर्वांच्या उपकारासाठी असू द्यावेत. एकमेकाविषयी ईर्ष्याद्वेष न करावा आणि सर्वांच्यासाठी सुखवृद्धी करावी. तसेच संसारात विघ्न-बाधा कधीही उद्भवू नये, यासाठी पति-पत्नीने आपसात प्रेमाने रहावे. ॥73॥
Subject
नातेवाईकांनी पति-पत्नीविषयी कोणती प्रतिज्ञा करावी, तसेच त्यांच्याकडून कोणती प्रतिज्ञा करवून घ्यावी, पुढील मंत्रात हा विषय प्रतिपादित आहे -