Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 11 / Mantra 72

83 Mantra
11/72
Devata- अग्निर्देवता Rishi- वारुणिर्ऋषिः Chhand- भुरिगुष्णिक् Swara- ऋषभः
Mantra with Swara
प॒र॒मस्याः॑ परा॒वतो॑ रो॒हिद॑श्वऽइ॒हाग॑हि। पु॒री॒ष्यः पुरुप्रि॒योऽग्ने॒ त्वं त॑रा॒ मृधः॑॥७२॥

प॒र॒मस्याः॑। प॒रा॒वत॒ इति॑ परा॒ऽवतः॑। रो॒हिद॑श्व॒ इति॑ रो॒हित्ऽअ॑श्वः। इ॒ह। आ। ग॒हि॒। पु॒री॒ष्यः᳖। पु॒रु॒प्रि॒य इति॑ पुरुऽप्रि॒यः। अग्ने॑। त्वम्। त॒र॒। मृधः॑ ॥७२ ॥

Mantra without Swara
परमस्याः परावतो रोहिदश्वऽइहा गहि । पुरीष्यः पुरुप्रियोग्ने त्वन्तरा मृधः ॥

परमस्याः। परावत इति पराऽवतः। रोहिदश्व इति रोहित्ऽअश्वः। इह। आ। गहि। पुरीष्यः। पुरुप्रिय इति पुरुऽप्रियः। अग्ने। त्वम्। तर। मृधः॥७२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ हे (अग्ने) पावकाप्रमाणे तेजस्वी हे विज्ञानवान पति, (रोहिदश्व:) अग्नी आदी पदार्थांनी (शक्ती वा ऊर्जाद्वारे) चालणार्‍या वाहनांनी (प्रवास करून) (पुरीष्य:) पालन करणार्‍यांत श्रेष्ठ आणि (पुरुप्रिय:) अनेकांविषयी स्नेहभाव असणारे (त्वम्) आपण (इह) या गृहाश्रमात (वधू राहत असलेल्या प्रदेशात) (परावत:) दूरवरच्या देशातून (परमस्या:) अत्यंत उत्तम गुण रुप आणि स्वभाव असलेल्या मुलीची (म्हणजे माझी) कीर्ती ऐकून (आगाहि) आला आहात. त्याचबरोबर आपण (मृध:) आता अन्यांच्या पदार्थां कामना करणार्‍या (स्वार्थी दुष्ट) शत्रूंचा (तर) तिरस्कार करा (परस्त्रीवर वाईट दृष्टीने पाहणार्‍याला योग्य शिक्षा द्या) ॥72॥
Essence
भावार्थ - मनुष्यांनी आपल्या मुलीचा वा मुलाचा विवाह जवळच्या देशात (स्थान, ग्राम वा नगरात) कदापि करू नये (मुलीला आपल्या गावापासून लाबंच्या गावी द्यावे आणि सून देखील दूरच्या प्रदेशाची करावी) कारण की मुलामुलीचा विवाहसंबंध जितक्या दूरच्या प्रदेशात केला जाईल, तितके अधिक सुख मिळते. जवळच्या गाव, प्रदेशाशी नाते जोडल्यास कलह वा कटकटी निर्माण होतात. ॥72॥
Subject
पत्नीने आपल्या पतीला काय सांगवे, पुढच्या मंत्रात याविषयी प्रतिपादन केले आहे -