Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 11 / Mantra 7

83 Mantra
11/7
Devata- सविता देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- आर्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
देव॑ सवितः॒ प्रसु॑व य॒ज्ञं प्रसु॑व य॒ज्ञप॑तिं॒ भगा॑य। दि॒व्यो ग॑न्ध॒र्वः के॑त॒पूः केत॑न्नः पुनातु वा॒चस्पति॒र्वाचं॑ नः स्वदतु॥७॥

देव॑। स॒वि॒त॒रिति॑ सवितः। प्र। सु॒व॒। य॒ज्ञम्। प्र। सु॒व॒। य॒ज्ञप॑ति॒मिति॑ य॒ज्ञऽप॑तिम्। भगा॑य। दि॒व्यः। ग॒न्ध॒र्वः। के॒त॒पूरिति॑ केत॒ऽपूः। केत॑म्। नः॒। पु॒ना॒तु॒। वा॒चः। पतिः॑। वाच॑म्। नः॒। स्व॒द॒तु॒ ॥७ ॥

Mantra without Swara
देव सवितः प्रसुव यज्ञम्प्रसुव यज्ञपतिम्भगाय । दिव्यो गन्धर्वः केतपूः केतन्नः पुनातु वाचस्पतिर्वाचन्नः स्वदतु ॥

देव। सवितरिति सवितः। प्र। सुव। यज्ञम्। प्र। सुव। यज्ञपतिमिति यज्ञऽपतिम्। भगाय। दिव्यः। गन्धर्वः। केतपूरिति केतऽपूः। केतम्। नः। पुनातु। वाचः। पतिः। वाचम्। नः। स्वदतु॥७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (देव) खर्‍या योगविद्येने ज्याची उपासना करणे शक्य आहे आणि जो शुद्धज्ञान देणारा आहे, अशा हे परमेश्वरा, तू (न:) आमच्याकरिता (भगाय) संपूर्ण ऐश्वर्य देणारे (यज्ञम्) सुखदायक आचरण (प्रसुव) उत्पन्न कर (आम्ही, तुझ्या उपासकांनी सदैव सुखकारी पवित्र कर्म करावेत, अशी बुद्धी दे) तसेच (यज्ञम्) सुखदायक आचरण (प्रसुव) उत्पन्न कर (आम्ही, तुझ्या उपासकांनी सदैव सुखकारी पवित्र कर्म करावेत, अशी बुद्धी दे) तसेच (यज्ञपतिम्) सुखदायक आचरणाचे रक्षण करणार्‍या मनुष्यास (सदाचरण करण्यासाठी आम्हांस प्रेरणा व साहाय्य देणार्‍या मनुष्यास) (प्रसुव) उत्पन्न कर (आम्हाला अशा सज्जनांची संगती लाभो) तू (गन्धर्व:) पृथ्वीला धारण करणारा आणि (दिव्य:) शुद्ध गुण, कर्म आणि स्वभावांमध्ये सर्वोत्तम आहेस. आमच्या (केतपू:) विज्ञानाला (पुनातु) पवित्र कर. तूच (वाचस्पति:) सत्यविद्येने परिपूर्ण अशी वेदवाणी प्रकट करून तिचे रक्षण करणारा आहेस. (कृपा करून) (न:) आमच्या (वाघम्) वाणीला (स्वदतु) स्वादिष्ट कर म्हणजे कोमल आणि मधुर कर ॥7॥
Essence
भावार्थ - जी माणसें समस्त ऐश्वर्यमय शुद्ध, निर्मल अशा ब्रह्माची उपासना करतात आणि योगविद्याप्राप्तीसाठी त्याची प्रार्थना करतात, ती सर्व ऐश्वर्य प्राप्त करतातच शिवाय आपल्या आत्म्यास शुद्ध करून योगविद्या प्राप्त करू शकतात. तसेच जे लोक ईश्वराची वाणी म्हणजे वेदवाणीप्रमाणे आपली वाणी शुद्ध ठेवतात. (अपवित्र कटुवचम बोलत नाहीत) ते सत्यवादी होतात आणि त्यामुळे सत्याचरणाद्वारे आपल्या यंत्राचे सुपरिणाम प्राप्त करतात ॥7॥
Subject
आता परमेश्वराची उपासना आणि प्रार्थना का करावी, याविषयी पुढील कथन केले आहे -