Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 11 / Mantra 67

83 Mantra
11/67
Devata- सविता देवता Rishi- आत्रेय ऋषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
विश्वो॑ दे॒वस्य॑ ने॒तुर्मर्तो॑ वुरीत स॒ख्यम्। विश्वो॑ रा॒यऽइ॑षुध्यति द्यु॒म्नं वृ॑णीत पु॒ष्यसे॒ स्वाहा॑॥६७॥

विश्वः॑। दे॒वस्य॑। ने॒तुः। मर्त्तः॑। वु॒री॒त॒। स॒ख्यम्। विश्वः॑। रा॒ये। इ॒षु॒ध्य॒ति॒। द्यु॒म्नम्। वृ॒णी॒त॒। पु॒ष्यसे॑। स्वाहा॑ ॥६७ ॥

Mantra without Swara
विश्वो देवस्य नेतुर्मर्ता वुरीत सख्यम् । विश्वो रायऽइषुध्यति द्युम्नँवृणीत पुष्यसे स्वाहा ॥

विश्वः। देवस्य। नेतुः। मर्त्तः। वुरीत। सख्यम्। विश्वः। राये। इषुध्यति। द्युम्नम्। वृणीत। पुष्यसे। स्वाहा॥६७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - ज्याप्रमाणे विद्वज्जन परमेश्वराचे सख्य वा आश्रय ग्रहण करतात, त्याप्रमाणे (विश्व:) इतर सर्व (मर्त्त:) मनुष्यांनीदेखील (नेतु) सर्वांचा जो नायक त्या (देवस्य) जगप्रकाशक ईश्वराची (सख्यम्) मैत्री (बुरीत) स्वीकार करावी (त्याच्या उपासनेतच मनुष्याचे कल्याण आहे) (विश्वे) सर्व मनुष्यांनी (राये) शोभेकरिता वा ऐश्वर्यप्राप्तीसाठी (इषुध्यति) बाण आदी शस्त्रें धारण करावीत. (स्वाहा) तसेच सत्यभाषण आणि (घुम्नम्) कांतिमान यश अथवा पौष्टिक अन्न यांचे (वृणीत) ग्रहण करावे. सत्यभाषण, कीर्ती व अन्नाद्वारे जसे तू (पुष्यसे) पुष्ट होतोस, तसेच आम्ही देखील पुष्ट वा वर्धमान व्हावे. ॥67॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. गृहस्थजनांना पाहिजे की त्यांनी परमेश्वराशी मैत्री जोडून प्रामाणिक व्यवहाराद्वारे धनप्राप्त करावे आणि अशी कर्में करावीत की ज्यामुळे त्यांची कीर्ती वाढेल ॥67॥
Subject
यानंतरच्या मंत्रात हे सांगितले आहे की गृहस्थजनांनी काय करावे -