Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 11 / Mantra 63

83 Mantra
11/63
Devata- सविता देवता Rishi- विश्वामित्र ऋषिः Chhand- भुरिग्बृहती बृहती Swara- मध्यमः
Mantra with Swara
दे॒वस्त्वा॑ सवि॒तोद्व॑पतु सुपा॒णिः स्व॑ङ्गु॒रिः सु॑बा॒हुरु॒त शक्त्या॑। अव्य॑थमाना पृथि॒व्यामाशा॒ दिश॒ऽआपृ॑ण॥६३॥

दे॒वः। त्वा॒। स॒वि॒ता। उत्। व॒प॒तु॒। सु॒पा॒णिरिति॑ सुऽपा॒णिः। स्व॑ङ्गु॒रिरिति॑ सुऽअङ्गु॒रिः। सु॒बा॒हुरिति॑ सुऽबा॒हुः। उ॒त। शक्त्या॑। अव्य॑थमाना। पृ॒थि॒व्याम्। आशाः॑। दिशः॑। आ। पृ॒ण॒ ॥६३ ॥

Mantra without Swara
देवस्त्वा सवितोद्वपतु सुपाणिः स्वङ्गुरिः सुबाहुरुत शक्त्या । अव्यथमाना पृथिव्यामाशा दिश आ पृण ॥

देवः। त्वा। सविता। उत्। वपतु। सुपाणिरिति सुऽपाणिः। स्वङ्गुरिरिति सुऽअङ्गुरिः। सुबाहुरिति सुऽबाहुः। उत। शक्त्या। अव्यथमाना। पृथिव्याम्। आशाः। दिशः। आ। पृण॥६३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे स्त्री (पत्नी), तुझा पती (सुबाहु:) बलशाली भुजा, (सुपाणि:) सुंदर हात आणि (स्वड्गुरि:) सुशोभन अंगुली (बोटें) असणारा आहे. अशा (सविता) सूर्याप्रमाणे ऐश्वर्यदाता आणि (देव:) उत्तम गुण, कर्म आणि स्वभाव असलेल्या आपल्या पतीच्या (शकत्या) सामर्थ्याने तू (पृथिव्यां) या भूतलावर वा (राज्यात, राज्यासाठी) (त्वा) तुला (उद्वपतु) तुझे उत्कर्ष घडवीत तुला गर्भवती करो (या सामर्थ्यशाली पतीच्या साहाय्याने तू राज्यासाठी श्रेष्ठ वीर पुत्रास जन्म दे) आणि तू देखील आपल्या सामर्थ्याने (अव्यथमाना) निर्भय, निश्चिंत होऊन पतीच्या साहाय्याने (आशा:) आपल्या इच्छा आणि यशाने सर्व (दिश:) दिशा (आपृण) पूर्ण कर (तुझी कीर्ती दूर दूर पसरो आणि तुझ्या कामना पूर्ण व्हाव्यात) ॥63॥
Essence
भावार्थ - सर्व स्त्री-पुरुषांसाठी आवश्यक आहे की एकमेकास प्रसन्न ठेवण्याचे प्रयत्न करावेत. मनापासून एकमेकास चाहत असलेल्या स्त्री-पुरुषांनी एकमेकाची नीट परीक्षा करून स्वेच्छेने स्वयंवर विवाह करावा. विवाहानंतरही विषयासक्तीचा त्याग करून केवळ ऋतुकाळातच गमन करावे अशा रुपात न वागून स्वसामर्थ्याची हानी कदापि करू नये. कारण असे की जे स्त्री-पुरुष जितेंद्रिय असतात, त्यांचा शरीरात कोणताही रोग प्रवेश करू शकत नाही आणि त्यांची शक्तीही क्षीण होत नाही. यामुळे (वरील उपदेशाप्रमाणे नियमांचे पालन अवश्य केले पाहिजे ॥63॥
Subject
पुढील मंत्रात तोच विषय प्रतिपादित आहे -