Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 11 / Mantra 62

83 Mantra
11/62
Devata- मित्रो देवता Rishi- विश्वामित्र ऋषिः Chhand- निचृदगायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
मि॒त्रस्य॑ चर्षणी॒धृतोऽवो॑ दे॒वस्य॑ सान॒सि। द्यु॒म्नं चि॒त्रश्र॑वस्तमम्॥६२॥

मि॒त्रस्य॑। च॒र्ष॒णी॒धृत॒ इति॑ चर्षणि॒ऽधृतः॑। अवः॑। दे॒वस्य॑। सा॒न॒सि। द्यु॒म्नम्। चि॒त्रश्र॑वस्तम॒मिति॑ चि॒त्रश्र॑वःऽतमम् ॥६२ ॥

Mantra without Swara
मित्रस्य चर्षणीधृतो वो देवस्य सानसि । द्युम्नञ्चित्रश्रवस्तमम् ॥

मित्रस्य। चर्षणीधृत इति चर्षणिऽधृतः। अवः। देवस्य। सानसि। द्युम्नम्। चित्रश्रवस्तममिति चित्रश्रवःऽतमम्॥६२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (पत्नीला उपदेश) हे स्त्री, तू (चर्षणीधृत:) चांगले शिक्षण व उपदेश देऊन सर्व मनुष्यांना (मनुष्यमात्राला) सुसंस्कृत करणार्‍या आणि (मित्रस्य) सर्वांचा मित्र असलेल्या (देवस्य) तुझ्या पतीचे जे (चित्रश्रवस्तमम्) नवनवीन अन्न आदी पदार्थ ज्या धनापासून तयार करता येतात, त्या (सानसि) सेवन करण्यास योग्य प्राचीन (धुम्नम्) धनाचे तू (अव:) रक्षण कर. (तुझा पती सर्वांचा हितकारी मित्र आहे. त्याची संपत्ती पवित्र मार्गाने अर्जित केलेली आहे. म्हणून तू त्या संपत्तीची प्राणपणाने जपणूक कर ) ॥62॥
Essence
भावार्थ - गृहकार्यात कुशल असलेल्या स्त्रीला पाहिजे की तिने घरातील सर्व कामे स्वत: करावीत आणि गृहसंपदेची सतत वृद्धी कशी होईल, याकडे लक्ष द्यावे. ॥62॥
Subject
स्त्री ज्या पुरुषांची पत्नी असेल, त्याच पुरूषाच्या (पतीच्या) ऐश्वर्याचे रक्षण तिने निरंतर व नेहमी करावे, याविषयी पुढील मंत्रात उपदेश केला आहे -