Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 11 / Mantra 6

83 Mantra
11/6
Devata- सविता देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- निचृज्जगती Swara- निषादः
Mantra with Swara
यस्य॑ प्र॒याण॒मन्व॒न्यऽइद्य॒युर्दे॒वा दे॒वस्य॑ महि॒मान॒मोज॑सा। यः पार्थि॑वानि विम॒मे सऽएत॑शो॒ रजा॑सि दे॒वः स॑वि॒ता म॑हित्व॒ना॥६॥

यस्य॑। प्र॒याण॑म्। प्र॒यान॒मिति॑ प्र॒ऽयान॑म्। अनु॑। अ॒न्ये। इत्। य॒युः। दे॒वाः। दे॒वस्य॑। म॒हि॒मान॑म्। ओज॑सा। यः। पार्थि॑वानि। वि॒म॒म इति॑ विऽम॒मे। सः। एत॑शः। रजा॑सि। दे॒वः। स॒वि॒ता। म॒हि॒त्व॒नेति॑ महिऽत्व॒ना ॥६ ॥

Mantra without Swara
यस्य प्रयाणमन्वन्यऽइद्ययुर्देवा देवस्य महिमानमोजसा । यः पार्थिवानि विममे सऽएतशो रजाँसि देवः सविता महित्वना ॥

यस्य। प्रयाणम्। प्रयानमिति प्रऽयानम्। अनु। अन्ये। इत्। ययुः। देवाः। देवस्य। महिमानम्। ओजसा। यः। पार्थिवानि। विमम इति विऽममे। सः। एतशः। रजासि। देवः। सविता। महित्वनेति महिऽत्वना॥६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे योगीजन हो, (यस्य) ज्या (देवस्थ) सर्व सुखदात्या परमेश्वराची (महिमानम्) महिमा आणि स्तुती (प्रयाणम्) सर्वसुखांची प्राप्ती करून देणारी आहेत (त्या स्तुती ईश्वर स्तुती, प्रार्थना उपासनेच्या) (अनु) मागे (अन्ये) जीवांनी आणि (देवा) विद्वज्जनांनी (ययु:) जायला हवे (सर्वांनी परमेश्वराची स्तुती केली पाहिजे, कारण ती सर्वसुख देणारी आहे) (य:) तोच परमात्मा (एतश:) सर्व जगामध्ये व्याप्त असून तोच (सविता) सर्व जगाचा निर्माता आहे, तोच (देव:) शुद्ध स्वरूप भगवान (महित्वना) आपल्या प्रहत्तेने आणि (ओजसा) सामर्थ्याने (पार्थिवावि) पृथ्वीवर असलेल्या (रजांसि) सर्व लोकांची (पदार्थांची) (विममे) लोक आदी यानांची निर्मिती करतात, त्याप्रमाणे जगाची व पदार्थांची रचना करतो. (स:) असा तो महान परमेश्वर (इत्)(एकमेव तोच) सर्वांनी सदैव उपासनीय मानावा ॥6॥
Essence
भावार्थ - परमेश्वर सर्व जगामधे, अंतरिक्षात वा शून्यात आपल्या अनंत शक्तिसामर्थ्याने व्यापक असून जगाचा धारक, रचविता आणि सर्वसुखदाता आहे, तोच एकमेव शुद्धस्वरूप आणि सर्व शक्तिमान असून सर्वांच्या हृदयीं विद्यमान आहे, जे विद्वज्जन अशा परमेश्वराची उपासना करतात, तेच सुखी होतात, अन्य कोणी नव्हे ॥6॥
Subject
मनुष्यांनी कोणाची उपासना करावी, याविषयी