Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 11 / Mantra 59

83 Mantra
11/59
Devata- अदितिर्देवता Rishi- सिन्धुद्वीप ऋषिः Chhand- आर्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
अदि॑त्यै॒ रास्ना॒स्यदि॑तिष्टे॒ बिलं॑ गृभ्णातु। कृ॒त्वाय॒ सा म॒हीमु॒खां मृ॒न्मयीं॒ योनि॑म॒ग्नये॑। पु॒त्रेभ्यः॒ प्राय॑च्छ॒ददि॑तिः श्र॒पया॒निति॑॥५९॥

अदि॑त्यै। रास्ना॑। अ॒सि॒। अदि॑तिः। ते॒। बिल॑म्। गृ॒भ्णा॒तु॒। कृ॒त्वाय॑। सा। म॒हीम्। उ॒खाम्। मृ॒न्मयी॒मिति॑ मृ॒त्ऽमयी॑म्। योनि॑म्। अ॒ग्नये॑। पु॒त्रेभ्यः॑। प्र। अ॒य॒च्छ॒त्। अदि॑तिः। श्र॒पया॑न्। इति॑ ॥५९ ॥

Mantra without Swara
अदित्यै राम्नासिस्यदितिष्टे बिलङ्गृभ्णातु । कृत्वाय सा महीमुखाम्मृन्मयीँयोनिमग्नये । पुत्रेभ्यः प्रायच्छददितिः श्रपयानिति ॥

अदित्यै। रास्ना। असि। अदितिः। ते। बिलम्। गृभ्णातु। कृत्वाय। सा। महीम्। उखाम्। मृन्मयीमिति मृत्ऽमयीम्। योनिम्। अग्नये। पुत्रेभ्यः। प्र। अयच्छत्। अदितिः। श्रपयान्। इति॥५९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (मुला-मुलीचे माता पिता अध्यापिकेस म्हणत आहेत) हे अध्यापन करणार्‍या विदुषी स्त्री, तुम्ही (अदिव्यै) विद्यादानासाठी रास्ना) दानशील वा सक्षम (असि) आहात, म्हणून तुम्हाला प्रार्थना करीत आहोत की (ते) तुमच्याकडून (बिलम्) ब्रह्मचर्य धारणाचेव्रत (कृत्वा) घेऊन (अदिति:) या पुनि आणि या कन्येने विद्या (गृभ्णात) ग्रहण करावी. (सा) ती म्हणजे तू (आदिति:) त्या मुलामुलीच्या मातेस (मातेप्रमाणे असलेल्या अध्यापिकेने) (मृन्मयीम्) मातीने (योनिम्) बनलेल्या (पृथक्) या मोठ्या (उखाम्) शिजविण्यासाठी वा पाककलेसाठी उपयोगात येणार्‍या पातेल्याला (अग्नये) अग्नीजवळ नेऊन (पुत्रेभ्य:) मुलाला/मुलीला द्यावे. आणि यास/हीस (पाककलेचे उत्कृष्ट ज्ञान देऊन) या पातेल्यात (इति) अशाप्रकारे (यापद्धतीने) (श्रपयान्) अग्नीदी पदार्थ शिजविणे शिकवावे (वा दोघांनी शिजवावे). ॥59॥
Essence
भावार्थ - मुलांनी मुलांसाठी असलेल्या आणि मुलींनीमुलींसाठी असलेल्या पाठशाळेत जाऊन त्यांनी तिथे ब्रह्मचर्यपूर्वक सुशिल स्वभावाने आणि योग्य विधीप्रमाणे विद्या आणि भोजन तयार करण्याची क्रिया शिकावी. आणि आहार-विहाराचे उचित नियम ही शिकावेत. विषयवासनेच्या कथा, वार्ता कधीही ऐकू नये. मद्यपान, मांसाहार वर्ज्य करून आलस्य व अतिनिद्रेचा त्याग करून अद्यापक/अध्यापिकेची सेवा करावी तसेच त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागून चांगल्या नियमांचा स्वीकार करावा. ॥59॥
Subject
पुन्हा पुढील मंत्रात तोच विषय कथित आहे -