Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 11 / Mantra 57

83 Mantra
11/57
Devata- अदितिर्देवता Rishi- सिन्धुद्वीप ऋषिः Chhand- भुरिग्बृहती Swara- मध्यमः
Mantra with Swara
उ॒खां कृ॑णोतु॒ शक्त्या॑ बा॒हुभ्या॒मदि॑तिर्धि॒या। मा॒ता पु॒त्रं यथो॒पस्थे॒ साग्निं बि॑भर्त्तु॒ गर्भ॒ऽआ। म॒खस्य॒ शिरो॑ऽसि॥५७॥

उ॒खाम्। कृ॒णो॒तु॒। शक्त्या॑। बा॒हुभ्या॒मिति॑ बा॒हुभ्या॑म्। अदि॑तिः। धि॒या। मा॒ता। पु॒त्रम्। यथा॑। उ॒पस्थ॒ इत्यु॒पऽस्थे॑। सा। अ॒ग्निम्। बि॒भ॒र्त्तु॒। गर्भे॑। आ। म॒खस्य॑। शिरः॑। अ॒सि॒ ॥५७ ॥

Mantra without Swara
उखाङ्कृणोतु शक्त्या बाहुभ्यामदितिर्धिया । माता पुत्रँयथोपस्थे साग्निम्बिभर्तु गर्भ आ । मखस्य शिरो सि ॥

उखाम्। कृणोतु। शक्त्या। बाहुभ्यामिति बाहुभ्याम्। अदितिः। धिया। माता। पुत्रम्। यथा। उपस्थ इत्युपऽस्थे। सा। अग्निम्। बिभर्त्तु। गर्भे। आ। मखस्य। शिरः। असि॥५७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे गृहस्थ पुरुषा, तू (लक्षात असू दे की तू लहान वा क्षुद्र मनुष्य नाहीस) तर तू (मखस्थ) यज्ञामधे (शिर:) उत्तमांगाप्रमाणे (म्हणजे सर्वश्रेष्ठ (असि) आहेस. तू (धिया) बुद्धिपूर्वक वा कौशल्याने कर्म करून तसेच (शक्त्या) पाकविद्येच्या ज्ञानानुसार (बाहुभ्याम्) आपल्या दोन्ही हातांनी (उखाम्) (औषधी आदी तयार करण्याच्या कामी येणार्‍या) या पातेल्याला (कृणोतु) तयार कर (वा दृढतेने धरून ठेव) तसेच (आदिति:) तुझी ही जी पत्नी आहे (सा) तिने (गर्भे) आपल्या गर्भाशयामध्ये (या औषधीच्या प्रभावामुळे (अग्निम्) अग्नीप्रमाणे तेजस्वी वीर्य (बिभर्तु) धारण करोव. (या औषधीच्या सेवनामुळे आणि शक्तीशाली पतीच्या वीर्यामुळे तुला गर्भ राहो) (यथा) ज्याप्रमाणे एक माता (उपस्थे) आपल्या मांडीवर (पुत्रम्) पुत्राला सुखपूर्वक बसविते (त्याप्रमाणे तू संतानप्राप्ती साठी गर्भात वीर्य धारण कर.) ॥57॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा अलंकार आहे. कुमारावस्थातील स्त्रीपुरुषांनी ब्रह्मचर्याचे पालन करीत विद्याध्ययन आणि उत्तम शिक्षण पूर्व करावे व बल, बुद्धी आणि पराक्रमाने संपन्न संतान उत्पन्न करण्यासाठी वैद्यकशास्त्रात सांगितलेल्या रीतीने मोठ्या गुणकारी औषधींचे निर्माण करावे, (शिजविण्याच्या/उकळण्याच्या/ तयार कण्याच्या पद्धतीप्रमाणे औषधी तयार कराव्यात) नंतर विधिपूर्वक गर्भाधान संस्कार करावा आणि त्यानंतर पथ्य पाळावे. नंतर एकमेकाशी मित्राप्रमाणे आचरण करीत आपल्या पुत्रांचेदेखील गर्भाधानादी संस्कार (वर सांगितलेल्या आणि स्वत: आपण अंगीकारलेल्या विधीप्रमाणे) करावेत ॥57॥
Subject
पुन्हा तोच विषय -