Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 11 / Mantra 55

83 Mantra
11/55
Devata- सिनीवाली देवता Rishi- सिन्धुद्वीप ऋषिः Chhand- विराडनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
सꣳसृ॑ष्टां॒ वसु॑भी रु॒द्रैर्धीरैः॑ कर्म॒ण्यां मृद॑म्। हस्ता॑भ्यां मृ॒द्वीं कृ॒त्वा सि॑नीवा॒ली कृ॑णोतु॒ ताम्॥५५॥

सꣳसृ॑ष्टा॒मिति॒ सम्ऽसृ॑ष्टाम्। वसु॑भि॒रिति॒ वसु॑ऽभिः। रु॒द्रैः। धीरैः॑। क॒र्म॒ण्या᳕म्। मृद॑म्। हस्ता॑भ्याम्। मृ॒द्वीम्। कृ॒त्वा। सि॒नी॒वा॒ली। कृ॒णो॒तु॒। ताम् ॥५५ ॥

Mantra without Swara
सँसृष्टाँवसुभी रुद्रैर्धीरैः कर्मण्याम्मृदम् । हस्ताभ्याम्मृद्वीङ्कृत्वा सिनीवाली कृणोतु ताम् ॥

सꣳसृष्टामिति सम्ऽसृष्टाम्। वसुभिरिति वसुऽभिः। रुद्रैः। धीरैः। कर्मण्याम्। मृदम्। हस्ताभ्याम्। मृद्वीम्। कृत्वा। सिनीवाली। कृणोतु। ताम्॥५५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (गृहपत्नी आपल्या पतीला सांगत आहे) हे पति, ज्याप्रमाणे एक कारागीर (कुंभार) हस्ताभ्याम्) आपल्या हातानीं (कर्मण्याम्) योग्यप्रकारे तयार केलेल्या (मृदम्) मातीला (पात्रनिर्मितीसाठी) अनुकूल बनवितो, त्याचप्रकारे (धीरै:) संयमी आणि (वसुभि:) चोवीस वर्षापर्यंत ब्रह्मचर्य सेवन करून विद्या प्राप्त केलेल्या आणि (रुद्रै:) चवेचाळीस वर्ष ब्रह्मचर्य धारणा करून विद्या आणि शक्तीने संपन्न झालेल्या अशा (अध्यापक वा आचार्याकडून) संसृष्टाम्) उत्तम शिक्षण प्राप्त केलेल्या ब्रह्मचारिणी युवतीला (हे पति, आपण) (मृद्वीम्) कोमल स्वभावाची (कृणोतु) करा (तिच्या स्वभावाला विनम्र वळण त्या) आणि जी (सिनीवाली) प्रेमाने मुलींचे पालन करू शकेल, अशा (ताम्) तिला (त्या ब्रह्मचारिणी युवतीला) आपल्या घरातील स्त्री (म्हणजे सेविका वा दासी) म्हणून ठेऊन सुखी रहा. ॥55॥
Essence
भावार्थ -या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे जसे कुंभार आदी कारागीर पाण्याने मातीला मऊ करून त्या मातीने घडा, (माठ, मटसी, दिवे आदी) पदार्थ बनवतात आणि (लोकांसाठी) सोयी करून देतात, त्याप्रमाणे विद्वान माता-पिताद्वारा सुशिक्षित केलेल्या प्रिय अशा ब्रह्मचारिणी कन्यांना पुरुषांनी विवाहप्रसंगी ग्रहण करून घरातील (विवाहोत्सवात अथवा गृहकार्यात) सर्व कामें करून घ्यावीत (सेविका म्हणून नेमवावीत) ॥55॥
Subject
स्त्रियांनी कशा प्रकारची दासी ठेवावी, याविषयी -
Footnote
(टीप : या मंत्राच्या हिंदी वेदभाष्यातील भावार्थाच्या शेवटच्या ओळीत ‘गृहाश्रम के सर्व काम सिद्ध करें’ असा पाठभेद काही पुस्तकात आढळतो. तोच ‘गृहाश्रम’ शब्द आवश्यक व योग्य आहे) (संदर्भ - सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा, दिल्लीद्वारा प्रसिद्ध यजुर्वेदभाष्य - पृष्ठ 363)