Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 11 / Mantra 54

83 Mantra
11/54
Devata- रुद्रा देवताः Rishi- सिन्धुद्वीप ऋषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
रु॒द्राः स॒ꣳसृज्य॑ पृथि॒वीं बृ॒हज्ज्योतिः॒ समी॑धिरे। तेषां॑ भा॒नुरज॑स्र॒ऽइच्छु॒क्रो दे॒वेषु॑ रोचते॥५४॥

रु॒द्राः। स॒ꣳसृज्येति॑ स॒म्ऽसृज्य॑। पृ॒थि॒वीम्। बृ॒हत्। ज्योतिः॑। सम्। ई॒धि॒रे॒। तेषा॑म्। भा॒नुः। अज॑स्रः। इत्। शु॒क्रः। दे॒वेषु॑। रो॒च॒ते॒ ॥५४ ॥

Mantra without Swara
रुद्राः सँसृज्य पृथिवीम्बृहज्ज्योतिः समीधिरे । तेषाम्भानुरजस्रऽइच्छुक्रो देवेषु रोचते ॥

रुद्राः। सꣳसृज्येति सम्ऽसृज्य। पृथिवीम्। बृहत्। ज्योतिः। सम्। ईधिर। तेषाम्। भानुः। अजस्रः। इत्। शुक्रः। देवेषु। रोचते॥५४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे स्त्री-पुरुषांनो, (इत्) ज्याप्रमाणे (रुद्रा:) प्राणवायूचे अवयव समान वायू आदी (अपान, व्यान, उदान) वायू (संसृज्य) सूर्याला उत्पन्न करून (पृथिवीम्) भूमीला (बृहत्) महान वा अतीन (ज्योति:) प्रकाश देऊन (समीधिरे) प्रकाशित करतात. (तेषाम्) आणि त्यांपासून (प्राणादी वायूपासून) उत्पन्न (शुक्र:) कान्तिमान (भानु:) सूर्य (देवेषु) दिव्य पृथ्वी आदीमधे (अजस्र:) निरंतर (रोचते) प्रकाशित होतो वा प्रकाश फैलावतो, त्याप्रमाणे तुम्ही (स्त्री आणि पुरुष) विद्यारुप सूर्याला उत्पन्न करून न्याय्य रीतीने प्रजाजनांना प्रकाशित म्हणजे शिक्षित करा आणि त्या विद्येद्वारे लोकांमधे दिव्य सुखाचा प्रसार करा ॥54॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा अलंकार आहे - ज्याप्रमाणे वायू सूर्याचे कारण आहे (सूर्य वायूचे कार्य आहे) सूर्य प्रकाशाचे कारण आहे (प्रकाश सूर्याचे कार्य आहे) आणि प्रकाश डोळ्यांनी पाहण्याचे कारण आहे (पाहणे हे कार्य आहे) त्याप्रमाणे स्त्री आणि पुरुषांनी (पति-पत्नी यांनी एकमेकानां सुख देण्याचे साधन वा नुपस्यधन व्हावे आणि अशाप्रकारे सर्वांसाठी सुखाचे कारण व्हावे. ॥54॥
Subject
पुन्हा पुढील मंत्रात तोच विषय कथित आहे -