Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 11 / Mantra 52

83 Mantra
11/52
Devata- आपो देवताः Rishi- सिन्धुद्वीप ऋषिः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
तस्मा॒ऽअं॑र गमाम वो॒ यस्य॒ क्षया॑य॒ जिन्व॑थ। आपो॑ ज॒नय॑था च नः॥५२॥

तस्मै॑। अर॑म्। ग॒मा॒म॒। वः॒। यस्य॑। क्षया॑य। जिन्व॑थ। आपः॑। ज॒नय॑थ। च॒। नः॒ ॥५२ ॥

Mantra without Swara
तस्माऽअरङ्गमाम वो यस्य क्षयाय जिन्वथ । आपो जनयथा च नः ॥

तस्मै। अरम्। गमाम। वः। यस्य। क्षयाय। जिन्वथ। आपः। जनयथ। च। नः॥५२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (आप:) पाण्याप्रमाणे शीतलस्वभाव असणार्‍या हे स्त्रियांनो, तुम्ही (न:) आम्हासह (आपापल्या पतीसह) (क्षयाय) उत्तम निवासस्थान अशा घरात राहून (जिन्वथ) संतुष्ट व तृप्त रहा आणि (जनयय) चांगली संताने उत्पन्न करा. तसेच (व:) (आम्ही देखील) तुमच्यासाठी (अरम्) आपल्या पूर्ण सामर्थ्यानिशी (गमाम) प्राप्त होऊ (तुमचे रक्षण करू) अर्थात तुम्ही (विवाह-समयीं) जी प्रतिज्ञा केली आहे, त्याचे पालन करणार्‍या व्हा आणि आम्ही देखील त्या प्रतिज्ञेचे पालन करणारे होऊन (सहजीवन व्यतीत करू) ॥52॥
Essence
भावार्थ - पतीची पत्नी व पत्नीचा पती, या सर्वांनी कधीही एकमेकाचे अनिष्ट-चिंतन करू नये. तसेच सुखदायी संततीसह आनंदित राहून धर्माप्रमाणे सर्व गृहकार्यें करावीत ॥52॥
Subject
पुन्हा त्याच विषयी पुढील मंत्रात उपदेश केला आहे -