Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 11 / Mantra 51

83 Mantra
11/51
Devata- आपो देवताः Rishi- सिन्धुद्वीप ऋषिः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
यो वः॑ शि॒वत॑मो॒ रस॒स्तस्य॑ भाजयते॒ह नः॑। उ॒श॒तीरि॑व मा॒तरः॑॥५१॥

यः। वः॒। शि॒वत॑म॒ इति॑ शि॒वऽत॑मः। रसः॑। तस्य॑। भा॒ज॒य॒त॒। इ॒ह। नः॒। उ॒श॒तीरि॒वेत्यु॑श॒तीःऽइ॑व। मा॒तरः॑ ॥५१ ॥

Mantra without Swara
यो वः शिवतमो रसस्तस्य भाजयतेह नः । उशतीरिव मातरः ॥

यः। वः। शिवतम इति शिवऽतमः। रसः। तस्य। भाजयत। इह। नः। उशतीरिवेत्युशतीःऽइव। मातरः॥५१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (पतींचे वचन) हे स्त्रियांनो इथे अनेकवचनी संबोधन आहे, पण एक पती आपल्या पत्नीस म्हणत आहे, असे अभिप्रेत आहे) (व:) तुमचा आणि (न:) आमचा (इह) या गृहाश्रमामधे जो (शिवतम:) अत्यंत सुखकारी (रस:) कर्तव्य वा आनंद आहे, (तस्य) त्याचा (मातर; उशतीखि) एक माता ज्याप्रमाणे पुत्राला जवळ घेऊन अतुलनीय आनंदाचे सेवन करते, तद्वत तुम्हीही या गृहाश्रमातील त्या आनंदाचा उपभोग घ्या (दोघांनी मिळून या संसारातील कर्तव्यांचे पालन आणि आनंदाचे सेवन करावे) ॥51॥
Essence
भावार्थ - स्त्रियांचे कर्तव्य आहे की त्यांनी आपापल्या पतीची सेवा तशाच प्रीतिभावनेने करावी की जशी माता-पिता आपल्या पुत्राची सेवा (लालन-पालन) करतात. त्याचप्रकारे पतीने देखील आपल्या पत्नीची प्रीतिपूर्वक सेवा करावी. ज्याप्रमाणे तहानलेले प्राणी पाण्यामुळे तृप्त व संतुष्ट होतात, त्याप्रमाणे पति व पत्नी यांनी उत्तम स्वभाव ठेवल्यास दोघांनाही प्रसन्नता लाभते किंवा लाभावी, असेच वर्तन दोघांनी ठेवावे ॥51॥
Subject
पुढील मंत्रातही तोच विषय सांगितला आहे -