Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 11 / Mantra 50

83 Mantra
11/50
Devata- आपो देवताः Rishi- सिन्धुद्वीप ऋषिः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
आपो॒ हि ष्ठा म॑यो॒भुव॒स्ता न॑ऽऊ॒र्जे द॑धातन। म॒हे रणा॑य॒ चक्ष॑से॥५०॥

आपः॑। हि। स्थ। म॒यो॒भुव॒ इति॑ मयः॒ऽभुवः॑। ताः। नः॒। ऊ॒र्जे। द॒धा॒त॒न॒। म॒हे। रणा॑य। चक्ष॑से ॥५० ॥

Mantra without Swara
आपो हि ष्ठा मयोभुवस्ता नऽऊर्जे दधातन । महे रणाय चक्षसे ॥

आपः। हि। स्थ। मयोभुव इति मयःऽभुवः। ताः। नः। ऊर्जे। दधातन। महे। रणाय। चक्षसे॥५०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (पुरुषांचे वचन) (आप:) पाणी जसे गुणकारक आणि व्याप्त आहे, तद्वत शुभ गुणांनी व्याप्त असणार्‍या हे सद्गुणी स्त्रियांनो, तुम्ही (मयोभुव:) सुख भोगणार्‍या (स्थ) व्हा (दु:खांपासून दूर रहा) तसेच (ता:) त्या सुखी स्त्रिया तुम्ही (ऊर्जे) स्वत:मधील बल आणि पराक्रम प्रकट करण्यासाठी आणि (महे) मोठमोठे (चक्षसे) वर्णनीय वा उल्लेखनीय (रणाय) युद्ध करण्यासाठी (न:) आम्हा पुरुषांना (हि) अवश्य व निश्चयाने (दधातन) धारण करा (आम्हास सहकारी योद्धा म्हणून सोबत घ्या) ॥50॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे पत्नीने स्वपतीस सुखी ठेवावे, तद्वत पतीनेदेखील आपल्या पत्नीला सदा सुखी करावे. या दोघांनी युद्धाच्या प्रसंगीदेखील एकमेकापासून दूर राहू नये म्हणजे सदैव एकत्र राहून सर्व कामें करावीत. ॥50॥
Subject
विवाहित स्त्री-पुरुषांनी एकमेकाशी कसे वर्तन करावे, पुढील मंत्रात याविषयी सांगितले आहे -