Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 11 / Mantra 5

83 Mantra
11/5
Devata- सविता देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- भुरिक्पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
यु॒जे वां॒ ब्रह्म॑ पू॒र्व्यं नमो॑भि॒र्वि श्लोक॑ऽएतु प॒थ्येव सू॒रेः। शृ॒ण्वन्तु॒ विश्वे॑ऽअ॒मृत॑स्य पु॒त्राऽआ ये धामा॑नि दि॒व्यानि॑ त॒स्थुः॥५॥

यु॒जे। वा॒म्। ब्रह्म॑। पू॒र्व्यम्। नमो॑भि॒रिति॒ नमः॑ऽभिः। वि। श्लोकः॑। ए॒तु॒। प॒थ्ये᳖वेति॑ प॒थ्या᳖ऽइव। सू॒रेः। शृ॒ण्वन्तु॑। विश्वे॑। अ॒मृत॑स्य। पु॒त्राः। आ। ये। धामा॑नि। दि॒व्यानि॑। त॒स्थुः ॥५ ॥

Mantra without Swara
युजे वाम्ब्रह्म पूर्व्यं नमोभिर्वि श्लोक एतु पथ्येव सूरेः । शृण्वन्तु विश्वेऽअमृतस्य पुत्राऽआ ये धामानि दिव्यानि तस्थुः ॥

युजे। वाम्। ब्रह्म। पूर्व्यम्। नमोभिरिति नमःऽभिः। वि। श्लोकः। एतु। पथ्येवेति पथ्याऽइव। सूरेः। शृण्वन्तु। विश्वे। अमृतस्य। पुत्राः। आ। ये। धामानि। दिव्यानि। तस्थुः॥५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे योगशास्त्राचे जिज्ञासूजन हो, जसे मी (एक विद्वान योगी) (श्लोक:) सत्यवाणीद्वारे आणि (नमोभि:) सत्काराद्वारे (आदर व पूज्यभाव ठेऊन) (पूर्न्यम्) पूर्वी झालेल्या योग्यांनी साक्षात केलेल्या (पद्धतीने) (ब्रहन) सर्वेश्वर परमात्म्याला (युजे) आपल्या आत्म्याशी संयुक्त करतो, तसेच (वाम्) तुम्हां दोघांना म्हणजे योगानुष्ठान करणारी आणि उपदेश देणारा (सूरे:) अशा दोघा विद्वानांना (पथ्येव) उत्तमगति प्राप्त करण्यासाठी (मोक्ष- प्राप्तीसाठी) तो परमेश्वर प्राप्त होऊ शकतो, तो (व्येतु) तुम्हास देखील विविध प्रयत्नांनी प्राप्त होवो. (अशी मी कामना करतो) तसचे ज्याप्रमाणे (पुत्रा:) श्रेष्ठ संतानाप्रमाणे आज्ञाकारी होऊन मोक्षप्राप्तीसाठी (विश्वे) सर्व विद्वान लोक (अमृतस्य) अविनाशी ईश्वराच्या संबंधाने (दिव्यानि) सुखदायक अशा (धामानि) स्थानास (मोक्षास) (आतुस्थु:) प्राप्त होतात, त्याप्रमाणे मी ही त्या (मोक्षसाधक विद्वानास मोक्षप्राप्तीसाठी) प्राप्त व्हावे (त्यांचा संग करावा) ॥5॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा अलंकार आहे. योगाभ्यासाविषयी जिज्ञासू असणार्‍या लोकांनी योगविद्येत कुशल असलेल्या जनांची संगती धरावी. त्यांच्या संगाने योगविधीचे ज्ञान प्राप्त करून ब्रह्मविद्येचा अभ्यास करावा. ज्याप्रमाणे विद्वानाने दाखविलेल्या मार्गाने गेल्यास सर्व जण सुखी होतात, त्याप्रमाणे योगाभ्यासींच्या संगतीमुळे योगविधीचे ज्ञान सहजतेने प्राप्त होते. कोणीही जीवात्मा अशा संगतीशिवाय आणि ब्रह्मज्ञानाशिवाय पवित्र होऊ शकत नाही आणि पवित्र झाल्याशिवाय त्यास सुख लाभणार नाही. यामुळे सर्व मनुष्यांनी योगविधी बरोबरच परब्रह्माची उपासना अवश्य केली पाहिजे. ॥5॥
Subject
मनुष्यांनी ईश्वराची प्राप्ती कशाप्रकारे करावी, याविषयी -