Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 11 / Mantra 47

83 Mantra
11/47
Devata- अग्निर्देवता Rishi- त्रित ऋषिः Chhand- विराड् ब्राह्मी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
ऋ॒तꣳ स॒त्यमृ॒तꣳ स॒त्यम॒ग्निं पु॑री॒ष्यमङ्गिर॒स्वद्भ॑रामः। ओष॑धयः॒ प्रति॑मोदध्वम॒ग्निमे॒तꣳ शि॒वमा॒यन्त॑म॒भ्यत्र॑ यु॒ष्माः। व्यस्य॒न् विश्वा॒ऽअनि॑रा॒ऽअमी॑वा नि॒षीद॑न्नो॒ऽअप॑ दुर्म॒तिं ज॑हि॥४७॥

ऋ॒तम्। स॒त्यम्। ऋ॒तम्। स॒त्यम्। अ॒ग्निम्। पु॒री॒ष्य᳖म्। अ॒ङ्गि॒र॒स्वत्। भ॒रा॒मः॒। ओष॑धयः। प्रति॑। मो॒द॒ध्व॒म्। अ॒ग्निम्। ए॒तम्। शि॒वम्। आ॒यन्त॒मित्या॒ऽयन्त॑म्। अ॒भि। अत्र॑। यु॒ष्माः। व्यस्य॒न्निति॑ वि॒ऽअस्य॑न्। विश्वाः॑। अनि॑राः। अमी॑वाः। नि॒षीद॑न्। नि॒सीद॒न्निति॑ नि॒ऽसीद॑न्। नः॒। अप॑। दु॒र्म॒तिमिति॑ दुःऽम॒तिम्। ज॒हि॒ ॥४७ ॥

Mantra without Swara
ऋतँ सत्यमृतँ सत्यमम्ग्निम्पुरीष्यमङ्गिरस्वद्भरामः । ओषधयः प्रतिमोदध्वमग्निमेतँ शिवमायन्तमभ्यत्र युष्माः । व्यस्यन्विश्वाऽअनिराऽअमीवा निषीदन्नो अप दुर्मतिञ्जहि ॥

ऋतम्। सत्यम्। ऋतम्। सत्यम्। अग्निम्। पुरीष्यम्। अङ्गिरस्वत्। भरामः। ओषधयः। प्रति। मोदध्वम्। अग्निम्। एतम्। शिवम्। आयन्तमित्याऽयन्तम्। अभि। अत्र। युष्माः। व्यस्यन्निति विऽअस्यन्। विश्वाः। अनिराः। अमीवाः। निषीदन्। निसीदन्निति निऽसीदन्। नः। अप। दुर्मतिमिति दुःऽमतिम्। जहि॥४७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (वरिष्ठ वृद्धजनांचे वचन युवा संतानांप्रत) हे सुसंतान हो, ज्याप्रमाणे आम्ही (वृद्ध व अनुभवी लोक) जे जे (ऋतम्) यथार्थ (सत्यम्) माशरहित तसेच (ऋतम्) अविरोधी आणि (सत्यम्) सत्य आहे तेच मानतो आणि तेच बोलतो, आणि सत्पुरुषांत, (सज्जनसभेत) बोलण्यास जे श्रेष्ठ व सत्य आहे, तेच बोलतो, व तसेच सत्याचरण करतो, याशिवाय आम्ही (पुरीष्यम्) आत्मरक्षणाच्या साधनात जे सर्वोत्तम अशा (अग्निम्) विद्युतेला (अड्विरस्वत्) वायूप्रमाणे (भराय:) धारण करतो (विद्युतशक्तीला वायूप्रमाणे जीवनावश्यक मानतो) (तसेच तुम्हीही माना, बोला आणि करा) तसेच पूर्ववर्णित (एतम्) (आयन्तम्) प्राम्पस प्राप्त झालेली जी (शिवम्) मंगलकारी (अग्रिम्) अग्नी आहे, त्याला प्राप्त करून तुम्ही देखील (अभिमोदध्वम्) आनंदित व सुखी रहा. ज्या (ओषधय:) जव आदी औषधी (युष्मा:) (प्रति) तुमच्या करिता मिळतील, त्यांचा आम्ही देखील उपयोग घेऊ. (याशिवाय नेहमी स्वस्थ राहण्यासाठी वैद्याला अशी विनंती करू की) “हे वैद्यराज, आपण (विश्वा:) सर्व अशा औषधी की ज्या (अनिरा:) नेहमी घेण्यासारख्या नाहीत (अर्थात अधिक घेतल्यास हानिकारक आहेत आणि (अमीषा:) रोग, व व्याधीच्या पीडापासून (व्यस्यन्) दूर ठेवणार्‍या आहेत, अशा औषधींचा (अन्न) या आयुर्वेदविद्येत (निवीषवन्) उपयोग करीत (न:) आम्हा लोकांची (दुर्मतिम्) दुष्ट बुद्धी (अपजहि) पूर्णपणे दूर करा” ॥47॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यांनो, तुम्हासाठी उचित आहे की सत्य आणि अविनाशी कारण जो ब्रह्म त्यास धारण करा (त्याची उपासना करा) दुसरे म्हणजे सत्य अविनाशी अव्यत्यजीव, याला सत्यभाषणादी आचरणाद्वारे धारण करा आणि तिसरे म्हणजे प्रकृतीपासून उत्पन्न अग्नी व औधषी आदी पदार्थांना धारण धरून (त्यांच्या उपयोग करून) ज्वर आदी शारीरिक व्याधी व आत्म्याच्या अविद्या आदी दोषांना निर्मूळ करावे. याशिवाय मध आदी द्रव्यांना त्याग करून (त्यांत कधीही लिप्त न होता) बुद्धी स्वच्छ ठेवावी आणि नित्य सुखी व आनंदित रहावे. कधीही या सांगितलेल्या नियमांविरूद्ध आचरण करून व्यर्थच सुख न भोगता दुखसागरात रडूं नका ॥47॥
Subject
मनुष्यांनी काय काय कसे आचरण करावे आणि काय काय व आचरण त्यागावे, यात्तिषयी पुढील मंत्रात उपदेश केला आहे -