Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 11 / Mantra 45

83 Mantra
11/45
Devata- अग्निर्देवता Rishi- त्रित ऋषिः Chhand- विराट् पथ्या बृहती छन्द Swara- मध्यमः
Mantra with Swara
शि॒वो भ॑व प्र॒जाभ्यो॒ मानु॑षीभ्य॒स्त्वम॑ङ्गिरः। मा द्यावा॑पृथि॒वीऽअ॒भि शो॑ची॒र्मान्तरि॑क्षं॒ मा वन॒स्पती॑न्॥४५॥

शि॒वः। भ॒व॒। प्र॒जाभ्य॒ इति॑ प्र॒जाऽभ्यः॑। मानु॑षीभ्यः। त्वम्। अ॒ङ्गि॒रः॒। मा। द्यावा॑पृथि॒वीऽइति॒ द्यावा॑पृथि॒वी। अ॒भि। शो॒चीः॒। मा। अ॒न्तरि॑क्षम्। मा। वन॒स्पती॑न् ॥४५ ॥

Mantra without Swara
शिवो भव प्रजाभ्यो मानुषीभ्यस्त्वमङ्गिरः । मा द्यावापृथिवी अभि शोचीर्मान्तरिक्षम्मा वनस्पतीन् ॥

शिवः। भव। प्रजाभ्य इति प्रजाऽभ्यः। मानुषीभ्यः। त्वम्। अङ्गिरः। मा। द्यावापृथिवीऽइति द्यावापृथिवी। अभि। शोचीः। मा। अन्तरिक्षम्। मा। वनस्पतीन्॥४५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (माता-पित्याचे वचन) हे (अड्गिर:) प्राणप्रिय संतान (पुत्र व पुत्री) तू (मानुषीभ्य:) मनुष्य आदी (प्रजाभ्य:) प्राण्यांकरिता (शिव:) कल्याणकारी, मंगलकारी (भव) हो. तू (द्यावा पृथिवी) विद्युत आणि भूमी यांविषयी (मा) (अभिशोची:) अति शोक करू नकोस आणि (वनस्पतीन्) वड आदी वृक्ष वनस्पतीविषयी शोक करू नकोस. (विद्युत, भूमी, आकाश आणि वृक्षवनस्पती तुला तुझ्या मंगलकारी मानव-कल्याणाकरिता भरपूर उपलब्ध आहेत. ते तुझ्या उपयोगी पडतील. त्यावस्तू कशा मिळतील याची चिंता करू नकोस. निसर्ग मोठा दाता आहे) ॥45॥
Essence
भावार्थ - उत्तम संतानांचे कर्त्तव्य आहे की त्यांनी सर्व प्राण्यांप्रती मंगलकारी कार्य करावे आणि पृथ्वी आदी पदार्थांविषयी शोक करू नये. पण त्याचबरोबर या सर्व पदार्थांचे रक्षण करून सर्वोपकाराकरिता उत्साहपूर्वक यत्न करावेत. ॥45॥
Subject
संतानांनी इतरांशी (मनुष्य आदी प्राण्यांशी) कसे वागावे, पुढील मंत्रात हा विषय कथित आहे -