Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 11 / Mantra 41

83 Mantra
11/41
Devata- अग्निर्देवता Rishi- विश्वमना ऋषिः Chhand- भुरिगनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
उदु॑ तिष्ठ स्वध्व॒रावा॑ नो दे॒व्या धि॒या। दृ॒शे च॑ भा॒सा बृ॑ह॒ता सु॑शु॒क्वनि॒राग्ने॑ याहि सुश॒स्तिभिः॑॥४१॥

उत्। ऊँ॒ इत्यूँ॑। ति॒ष्ठ॒। स्व॒ध्व॒रेति॑ सुऽअध्वर। अव॑। नः॒। दे॒व्या। धि॒या। दृ॒शे। च॒। भा॒सा। बृ॒ह॒ता। सु॒शु॒क्वनि॒रिति॑ सुऽशु॒क्वनिः॑। आ। अ॒ग्ने॒। या॒हि॒। सु॒श॒स्तिभि॒रिति॑ सुश॒स्तिऽभिः॑ ॥४१ ॥

Mantra without Swara
उदु तिष्ठ स्वध्वरावा नो देव्या धिया । दृशे च भासा बृहता शुशुक्वनिराग्ने याहि सुशस्तिभिः ॥

उत्। ऊँ इत्यूँ। तिष्ठ। स्वध्वरेति सुऽअध्वर। अव। नः। देव्या। धिया। दृशे। च। भासा। बृहता। सुशुक्वनिरिति सुऽशुक्वनिः। आ। अग्ने। याहि। सुशस्तिभिरिति सुशस्तिऽभिः॥४१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (समाजजनांची प्रार्थना विद्वानाप्रती) हे (स्वध्वर) श्रेष्ठ माननीय आचरण करणारे सज्जन विद्वान गृहस्थ, आपण सदा (उत्तिष्ठ) आपल्या पुरुषार्थ-श्रमाने उन्नती करा आणि त्याप्रमाणे अन्य मनुष्यानाही सदा तसा पुरुषार्ध करण्यास प्रवृत्त करा. तसेच आपण (देव्या) शुद्ध विद्या व ज्ञानाने समृद्ध अशा (धिया) बुद्धीद्वारे आणि क्रियांद्वारे (न:) आमचे (सामाजिक जनांचे) (अर) रक्षण करा. हे (अग्ने) अग्नीप्रमाणे प्रकाशमान (कीर्तिमान) आणि (सुशुक्वनि:) चांगल्या पवित्र पदार्थांचे यथोचित विभाग करणारे आपण (उ) तर्क व युक्तीसह (दृशे) पाहण्यासाठी जसा (बृहता) महान् (भारत) भासमान सूर्य आहे, त्याप्रमाणे (सुशस्तिभि:) सुंदर प्रशंसनीय गुणांसह सर्व विद्या (याहि) प्राप्त करा आणि तसेच आमच्याकरिता सर्व विद्यांचे आम्हांस दान द्या ॥41॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकुलप्तोपमा अलंकार आहे. विद्वज्जनांसाठी हे उचित कर्म हो की त्यांनी शुद्धविद्या आणि बुद्धिचे दान देऊन त्याद्वारे सर्व मनुष्यांची रक्षा करावी. कारण असे की उत्तम विद्येविना मनुष्यांकरिता सुखप्राप्तीचा अन्य कोणताही मार्ग वा आश्रमस्थान नाही. यासाठी सर्वांना उचित आहे की आलस्य, छल-कपट आदी कुकृत्य करणे सोडून सदैव विद्येच्या प्रचार-प्रसारासाठी यत्न करावेत. ॥41॥
Subject
पुढील मंत्रात विद्वानांच्या कर्तव्याविषयीं उपदेश केला आहे -