Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 11 / Mantra 38

83 Mantra
11/38
Devata- आपो देवताः Rishi- सिन्धुद्वीप ऋषिः Chhand- न्युङ्कुसारिणी बृहती Swara- मध्यमः
Mantra with Swara
अ॒पो दे॒वीरुप॑सृज॒ मधु॑मतीरय॒क्ष्माय॑ प्र॒जाभ्यः॑। तासा॑मा॒स्थाना॒दुज्जि॑हता॒मोष॑धयः सुपिप्प॒लाः॥३८॥

अ॒पः। दे॒वीः। उप॑। सृ॒ज॒। मधु॑मती॒रिति॒ मधु॑ऽमतीः। अ॒य॒क्ष्माय॑। प्र॒जाभ्य॒ इति॑ प्र॒ऽजाभ्यः॑। तासा॑म्। आ॒स्थाना॒दित्या॒ऽस्थाना॑त्। उत्। जि॒ह॒ता॒म्। ओष॑धयः। सु॒पि॒प्प॒ला इति॑ सुऽपिप्प॒लाः ॥३८ ॥

Mantra without Swara
अपो देवीरुपसृज मधुमतीरयक्ष्माय प्रजाभ्यः । तासामास्थानादुज्जिहतामोषधयः सुपिप्पलाः ॥

अपः। देवीः। उप। सृज। मधुमतीरिति मधुऽमतीः। अयक्ष्माय। प्रजाभ्य इति प्रऽजाभ्यः। तासाम्। आस्थानादित्याऽस्थानात्। उत्। जिहताम्। ओषधयः। सुपिप्पला इति सुऽपिप्पलाः॥३८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (गृहाश्रमीजन वैद्यराजाला विनंती करीत आहेत) हे श्रेष्ठ वैद्यराज, आपण (मधुमती:) प्रशंसनीय, मधुर आदी गुणांनीयुक्त (देवी:) पवित्र (शुद्ध व गुणकारी) (अप:) जलांचे (उपसृज) निर्माण करा (शुद्ध पेय जल, आसव, काढे आदी द्रवरुप औषधी तयार करा) (तासाम्) त्या जनांच्या (आश्रयात्) साहाय्याने (सुपिफला:) सुंदर फळ देणार्‍या (ओषधय:) सोमलता आदी औषधी उत्पन्न करा आणि अशाप्रकारे (प्रजाभ्य:) रक्षणास पात्र अशा प्राण्याना त्रास देणार्‍या (अयक्ष्याय) यक्ष्मा आदी रोगांच्या निवारणासाठी (उज्जिहताम्) सिद्ध व्हा ॥38॥
Essence
भावार्थ - राजाने दोन प्रकारचे वैद्य आपल्या राज्यात ठेवावेत (वा नियुक्त करावेत) पहिल्या प्रकारचे ते की जे सुगंधित पदार्थांनी होम-हवन करून वायू, वृष्टी, जल आणि औषधी, यांना शुद्ध करतील, दुसर्‍या प्रकारचे श्रेष्ठ वैद्य ते की जे रोग निदान उपचार आदी द्वारा सर्व प्राण्यांना नीरोग ठेवतील. अशी व्यवस्था केल्याशिवाय जगात सार्वजनिक सुख कदापि होऊ शकणार नाही. ॥38॥
Subject
यापुढे जल आदी पदार्थांच्या शोधनकार्यामुळे प्रजेला कोणकोणते लाभ मिळतात, याविषयी पुढील मंत्रात सांगितले आहे -