Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 11 / Mantra 37

83 Mantra
11/37
Devata- अग्निर्देवता Rishi- प्रस्कण्व ऋषिः Chhand- निचृदार्षी बृहती Swara- मध्यमः
Mantra with Swara
सꣳसी॑दस्व म॒हाँ२ऽअ॑सि॒ शोच॑स्व देव॒वीत॑मः। वि धू॒मम॑ग्नेऽअरु॒षं मि॑येध्य सृ॒ज प्र॑शस्त दर्श॒तम्॥३७॥

सम्। सी॒द॒स्व॒। म॒हान्। अ॒सि॒। शोच॑स्व। दे॒व॒वीत॑म॒ इति॑ देव॒ऽवीत॑मः। वि। धू॒मम्। अ॒ग्ने॒। अ॒रु॒षम्। मि॒ये॒ध्य॒। सृ॒ज। प्र॒श॒स्तेति॑ प्रऽशस्त। द॒र्श॒तम् ॥३७ ॥

Mantra without Swara
सँ सीदस्व महाँऽअसि शोचस्व देववीतमः । वि धूममग्नेऽअरुषम्मियेध्य सृज प्रशस्त दर्शतम् ॥

सम्। सीदस्व। महान्। असि। शोचस्व। देववीतम इति देवऽवीतमः। वि। धूमम्। अग्ने। अरुषम्। मियेध्य। सृज। प्रशस्तेति प्रऽशस्त। दर्शतम्॥३७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (शिष्याचे वा गृहस्थाचे वचन) हे (प्रशस्त) प्रशंसनीय आणि (मियेध्य) दुर्जनांना दूर ठेवणार्‍या (अग्ने) तेजस्वी विद्वान (अध्यापरुमा आचार्य), आपण (देववीतम:) विद्वानांना अतिशय इष्ट व प्रिय व्यक्ती आहात. (विधूमम्) आपण निर्मळ स्वभाव चरित्र्य आणि (दर्शतम्) दर्शनीय (अरुषम्) मनोहर रुप (सृज) निर्माण करा (आपल्या उत्तम चारित्र्य आणि विद्या-ज्ञानामुळे लोक आपल्या दर्शनासाठी येतील, असे आपले व्यक्तिमत्व बनवा) आणि अशाप्रकारे आपण अधिकच (शोचस्व) पवित्र (वा वंदनीय) व्हा. कारण की आपण (महान्) महान गुणांनी युक्त असे विद्वान (असि) आहात, म्हणून (विनंती की) या अध्यापन-आसनावर (संसीदस्व) स्थानापन्न व्हा. (अध्यापक शिष्यांना आणि समाजाला दर्शनीय, पवित्र व वंदनीय असायला हवा) ॥37॥
Essence
भावार्थ - जो माणूस विद्वानांना (त्याच्या प्रचंड ज्ञानामुळे) अत्यंत प्रिय आहे, जो उत्तम रुप, गुण आणि सौन्दर्याने युक्त आहे, पवित्र असून धर्माला व आप्त (विश्वसनीय) विद्वान आहे, तोच शास्त्रअध्यापनासाठी पात्र व समर्थ होऊ शकतो) ॥37॥
Subject
पठन-पाठन (अध्ययन-अध्यापन) कार्य करणारा अध्यापक कसा असावा, पुढील मंत्रात याविषयी सांगितले आहे -