Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 11 / Mantra 34

83 Mantra
11/34
Devata- अग्निर्देवता Rishi- भारद्वाज ऋषिः Chhand- निचृद्गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
तमु॑ त्वा पा॒थ्यो वृषा॒ समी॑धे दस्यु॒हन्त॑मम्। ध॒न॒ञ्ज॒यꣳ रणे॑रणे॥३४॥

तम्। ऊ॒ इत्यूँ॑। त्वा॒। पा॒थ्यः। वृषा॑। सम्। ई॒धे॒। द॒स्यु॒हन्त॑म॒मिति॑ दस्यु॒हन्ऽत॑मम्। ध॒न॒ञ्ज॒यमिति॑ धनम्ऽज॒यम्। रणे॑रण॒ इति॒ रणे॑ऽरणे ॥३४ ॥

Mantra without Swara
तमु त्वा पाथ्यो वृषा समीधे दस्युहन्तमम् । धनञ्जयँ रणेरणे ॥

तम्। ऊ इत्यूँ। त्वा। पाथ्यः। वृषा। सम्। ईधे। दस्युहन्तममिति दस्युहन्ऽतमम्। धनञ्जयमिति धनम्ऽजयम्। रणेरण इति रणेऽरणे॥३४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे वीर पुरुष (हे राजा) आपण (पाथ्य:) अन्न, जल आदी पदार्थांच्या प्राप्तीत कुशल असून (वृषा) पराक्रमी शूर आणि विद्यावान आहात. (तम्) आपण त्या पूर्ववर्णित पदार्थविद्या आदींचे ज्ञानी, (धनञ्जयम्) शत्रूंचे धन जिंकणारे (उ) आणि (दस्युहन्तम्) दरोडेखोर वा लुटारुंचा समूळ नाश करणारे आहात. (त्वा) आपण आपल्या वीर सैनिकांच्या सेनेला राजधर्माचे शिक्षणाद्वारे (समीधे) प्रदीप्त करावे. (वीर सैनिकांना योग्य प्रशिक्षण देऊन युद्ध आणि शासन कार्यात नियुक्त करावे) ॥34॥
Essence
भावार्थ - राजा आणि राजपुरुषांचे कर्तव्य आहे की त्यांनी आप्त, धर्मात्मा विद्वानांकडून विनयवृत्ती तसेच युद्धविद्या शिकावी आणि त्याद्वारे प्रजेचे रक्षण करीत, चोर-लुटारुंचा बंदोवस्त करीत शत्रूंचा बीमोड करावा आणि परम ऐश्वर्याची प्राप्ती करावी ॥34॥
Subject
पुढील मंत्रातदेखील तोच विषय सांगितला आहे -