Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 11 / Mantra 30

83 Mantra
11/30
Devata- दम्पती देवते Rishi- गृत्समद ऋषिः Chhand- विराडार्ष्यनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
शर्म॑ च॒ स्थो वर्म॑ च॒ स्थोऽछि॑द्रे बहु॒लेऽउ॒भे। व्यच॑स्वती॒ संव॑साथां भृ॒तम॒ग्निं पु॑री॒ष्यम्॥३०॥

शर्म्म॑। च॒। स्थः॒। वर्म्म॑। च॒। स्थः॒। अछि॑द्रे॒ऽइत्यछि॑द्रे। ब॒हु॒लेऽइति॑ बहु॒ले। उ॒भेऽइत्यु॒भे। व्यच॑स्वती॒ऽइति॑ व्यच॑स्वती। सम्। व॒सा॒था॒म्। भृ॒तम्। अ॒ग्निम्। पु॒री॒ष्य᳖म् ॥३० ॥

Mantra without Swara
शर्म च स्थो वर्म च स्थोच्छिद्रे बहुलेऽउभे । व्यचस्वती सँवसाथाम्भृतमग्निं पुरीष्यम् ॥

शर्म्म। च। स्थः। वर्म्म। च। स्थः। अछिद्रेऽइत्यछिद्रे। बहुलेऽइति बहुले। उभेऽइत्युभे। व्यचस्वतीऽइति व्यचस्वती। सम्। वसाथाम्। भृतम्। अग्निम्। पुरीष्यम्॥३०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे गृहाश्रमी स्त्रीपुरुषहो, (पति-पत्नी) तुम्हा दोघांना (शर्म) हे घर व गृहाश्रम (च) आणि त्यासाठी आवश्यक सर्व सामग्री (अन्न, जल, आच्छादनादी) प्राप्त झालेली आहे. (वर्म) सर्वधा सुखकारक अशा त्या पदार्थांचा (उभे) तुम्ही दोघे (बहुले) अनेक समृद्धी देणारी आणि (व्यचस्वती) सुखदायक अशा (अच्छिद्रे) दोषरहित विद्युतशक्तीच्या साहाय्याने (उपयोग करा) तसेच तुमच्या ज्या घरात अंतरिक्षाप्रमाणे धर्म आणि अर्थ यांसाठी कार्य या व्यवहार (स्थ:) होत आहेत, त्या घरात (भृतम्) भरपूर पोषण देणार्‍या आणि (पुरीष्यम्) रक्षण करण्यात सर्वोत्तम अशा (अग्निम्) अग्नीचे ग्रहण करून (संवसाथाम्) चांगल्याप्रकारे आच्छादन करून (उत्तम छत अथवा पांघरूण आदीची व्यवस्था करून) त्या घरात निश्चितपणे निवास करा ॥30॥
Essence
भावार्थ - गृहस्थजनांचे कर्तव्य आहे की त्यांनी ब्रह्मचर्याचे पालन करीत (ऋतुगामी वा संततीकामी होऊन) (अतिथींचा) योग्य सत्कार व (दीन-दुबळ्यांवर) उपकार करीत, कौशल्यपूर्वक कार्य आणि विद्याग्रहण करावे. तसेच अशा घरांची निर्मिती करावी की ज्यात अनेक दार असावेत, जे सर्व ऋतूंत सुखकारक आणि सर्वदिशांतून रक्षण करण्यात समर्थ असून अग्नी आदी साधनांनी युक्त असावेत ॥30॥
Subject
missing