Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 11 / Mantra 3

83 Mantra
11/3
Devata- सविता देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- निचृदनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
यु॒क्त्वाय॑ सवि॒ता दे॒वान्त्स्व॑र्य॒तो धि॒या दिव॑म्। बृ॒हज्ज्योतिः॑ करिष्य॒तः स॑वि॒ता प्रसु॑वाति॒ तान्॥३॥

यु॒क्त्वाय॑। स॒वि॒ता। दे॒वान्। स्वः॑। य॒तः। धि॒या। दिव॑म्। बृ॒हत्। ज्योतिः॑। क॒रि॒ष्य॒तः। स॒वि॒ता। प्र। सु॒वा॒ति॒। तान् ॥३ ॥

Mantra without Swara
युक्त्वाय सविता देवान्त्स्वर्यतो धिया दिवम् । बृहज्ज्योतिः करिष्यतः सविता प्र सुवाति तान् ॥

युक्त्वाय। सविता। देवान्। स्वः। यतः। धिया। दिवम्। बृहत्। ज्योतिः। करिष्यतः। सविता। प्र। सुवाति। तान्॥३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (सविता) योगाद्वारे पदार्थांचे ज्ञान प्राप्त करून त्याचा आनंद उपभोगणारे योगी जन आपल्या मनाला (युक्त्वाय) त्या पदार्थांशी संयुक्त करतो आणि (धिया) आपल्या बुद्धीने (दिवम्) विद्येचा प्रकाश आणि (स्व:) सुख (यत:) प्राप्त करविणारे वा देणारे (बृहत्) महान (ज्योति:) विज्ञान (करिष्यत:) प्रकट करतात, वा पुढे प्रकट करतील त्या (देवान्) दिव्य गुणांना (प्रसुवाति) सर्वांनी उत्पन्न करावे आणि (तान्) अन्य लोकांनीदेखील उत्पन्न करावे (योगीजनांप्रमाणे) इतरेजनांनी देखील योगाभ्यास करून दिव्य ज्ञान व त्याचे लाभ प्राप्त करावेत) ॥3॥
Essence
भावार्थ - जे लोक योगाभ्यास करतात, ते अविद्या, अज्ञान आदी क्लेशकारी दु:खांना नष्ट करून (पदार्थांचे शुद्ध गुण प्रकट करू शकतात. )तसेच जो कोणी उपदेशक वा विद्वान योग आणि तत्त्वज्ञान प्राप्त करून योगीजनाप्रमाणे योगाभ्यास करील, तर तो देखील त्या दिव्य गुणांचा लाभ घेऊ शकेल ॥3॥
Subject
पुढील मंत्रात ही तोच विषय कथित आहे -