Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 11 / Mantra 29

83 Mantra
11/29
Devata- अग्निर्देवता Rishi- गृत्समद ऋषिः Chhand- स्वराट् पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
अ॒पां पृ॒ष्ठम॑सि॒ योनि॑र॒ग्नेः स॑मु॒द्रम॒भितः॒ पिन्व॑मानम्। वर्ध॑मानो म॒हाँ२ऽआ च॒ पुष्क॑रे दि॒वो मात्र॑या वरि॒म्णा प्र॑थस्व॥२९॥

अ॒पाम्। पृ॒ष्ठम्। अ॒सि॒। योनिः॑। अ॒ग्नेः। स॒मु॒द्रम्। अ॒भितः॑। पिन्व॑मानम्। वर्ध॑मानः। म॒हान्। आ। च॒। पुष्क॑रे। दि॒वः। मात्र॑या। व॒रि॒म्णा। प्र॒थ॒स्व॒ ॥२९ ॥

Mantra without Swara
अपाम्पृष्ठमसि योनिरग्नेः समुद्रमभितः पिन्वमानम् । वर्धमानो महाँ आ च पुष्करे दिवो मात्रया वरिम्णा प्रथस्व ॥

अपाम्। पृष्ठम्। असि। योनिः। अग्नेः। समुद्रम्। अभितः। पिन्वमानम्। वर्धमानः। महान्। आ। च। पुष्करे। दिवः। मात्रया। वरिम्णा। प्रथस्व॥२९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्वान (वैज्ञानिक वा अभियंता) आपण (अग्ने:) सर्वत्र व्याप्त विद्युतरूप अग्नीच्या (योनि:) संयोग वियोगाच्या रीतीचे (वीज जोडणे, प्रवाहित करणे, बंद करणे आदींचे) जाणकार आहात, आमच्याकरिता (सर्व नागरिकांकरिता (महान पूजनीय आणि (वर्धमान:) अग्निविद्या व क्रिया याद्वारे (नित्य नवे ज्ञान मिळतील) वृद्धिंगत होणारे (असि) आहात. याकरिता (अभित:) सर्व दिशांतून (पिन्वमानम्) बरसणार्‍या (अपाम्) पाण्याच्या (पृष्ठे) आधारावरून (सर्व पाण्यांतून) (पुष्करे) अंतरिक्षात विद्यमान पाण्यातून (दिव:) दीप्तीच्या (मात्रया) वर्धमान भागातून आणि (समुद्रम्) ज्यात जल-लहरी उंच उंच उठतात अशा समुद्रातून (च) आणि तेथील सर्व पदार्थांचे ज्ञान कौशल्याद्वारे प्राप्त करून (वरिम्णा) अधिक प्रगत ज्ञानाद्वारे (आप्रथस्व) आणखी अधिक सुखांचा (सुख-सुविधामय जीवनाचा) विस्तार करा (भूजल, आकाशस्थ जल वा विद्युत तसेच समुद्रजलातून विद्युतेचे उत्पादन अधिकाधिक करावे.) ॥21॥
Essence
भावार्थ - मनुष्यांनो, तुम्ही हे नीट जाणून व समजून घ्या की ज्याप्रमाणे पृथ्वी आदी स्थूल पदार्थांमध्ये वीज आहे, तद्वत पाण्यातही असते. म्हणून त्या विजेपासून विविध उपयोग वा लाभ घेत मोठ्या महान सुखांची प्राप्ती करा. ॥29॥
Subject
पुनश्च, मनुष्यांनी वीज कशाप्रकारे प्राप्त करावी, याविषयी पुढील मंत्रात सांगितले आहे -