Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 11 / Mantra 28

83 Mantra
11/28
Devata- अग्निर्देवता Rishi- गृत्समद ऋषिः Chhand- प्रकृतिः Swara- धैवतः
Mantra with Swara
दे॒वस्य॑ त्वा सवि॒तुः प्र॑सवेऽश्विनो॑र्बा॒हुभ्यां॑ पू॒ष्णो हस्ता॑भ्याम्। पृ॒थि॒व्याः स॒धस्था॑द॒ग्निं पु॑री॒ष्यमङ्गिर॒स्वत् ख॑नामि। ज्योति॑ष्मन्तं त्वाग्ने सु॒प्रती॑क॒मज॑स्रेण भा॒नुना॒ दीद्य॑तम्। शि॒वं प्र॒जाभ्योऽहि॑ꣳसन्तं पृथि॒व्याः स॒धस्था॑द॒ग्निं पु॑री॒ष्यमङ्गिर॒स्वत् ख॑नामः॥२८॥

दे॒वस्य॑। त्वा॒। स॒वि॒तुः। प्र॒स॒व इति॑ प्रऽस॒वे। अ॒श्विनोः॑। बा॒हुभ्या॑म्। पू॒ष्णः। हस्ता॑भ्याम्। पृ॒थि॒व्याः। स॒धस्था॒दिति॑ स॒धऽस्था॑त्। अ॒ग्निम्। पु॒री॒ष्य᳖म्। अ॒ङ्गि॒र॒स्वत्। ख॒ना॒मि॒। ज्योति॑ष्मन्तम्। त्वा। अ॒ग्ने॒। सु॒प्रती॑क॒मिति॑ सु॒ऽप्रती॑कम्। अज॑स्रेण। भा॒नुना॑। दीद्य॑तम्। शि॒वम्। प्र॒जाभ्य॒ इति॑ प्र॒ऽजाभ्यः॑। अहि॑ꣳसन्तम्। पृ॒थि॒व्याः। स॒धस्था॒दिति॑ स॒धऽस्था॑त्। अ॒ग्निम्। पु॒री॒ष्य᳖म्। अ॒ङ्गि॒र॒स्वत्। ख॒ना॒मः॒ ॥२८ ॥

Mantra without Swara
देवस्य त्वा सवितुः प्रसवेश्विनोर्बाहुभ्याम्पूष्णो हस्ताभ्याम् । पृथिव्याः सधस्थादग्निं पुरीष्यमङ्गिरस्वत्खनामा। ज्योतिष्मन्तन्त्वाग्ने सुप्रतीकमजस्रेण भानुना दीद्यतम् । शिवम्प्रजाभ्यो हिँसन्तँ पृथिव्या सधस्थादग्निम्पुरीष्यमङ्गिरस्वत्खनामः ॥

देवस्य। त्वा। सवितुः। प्रसव इति प्रऽसवे। अश्विनोः। बाहुभ्याम्। पूष्णः। हस्ताभ्याम्। पृथिव्याः। सधस्थादिति सधऽस्थात्। अग्निम्। पुरीष्यम्। अङ्गिरस्वत्। खनामि। ज्योतिष्मन्तम्। त्वा। अग्ने। सुप्रतीकमिति सुऽप्रतीकम्। अजस्रेण। भानुना। दीद्यतम्। शिवम्। प्रजाभ्य इति प्रऽजाभ्यः। अहिꣳसन्तम्। पृथिव्याः। सधस्थादिति सधऽस्थात्। अग्निम्। पुरीष्यम्। अङ्गिरस्वत्। खनामः॥२८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (अग्ने) भूगर्भाविद्या व शिल्पविद्येचे ज्ञाता हे विद्वान (वैज्ञानिक वा अभियंता) (सवितु:) सर्व जगाचा उत्पत्तिकर्ता (देवस्य) परमेश्वराने (प्रसवे) उत्पन्न केलेल्या या संसारात मी (एक नागरिक) आपणास (अश्विनो:) आकाश आणि पृथ्वीच्या (बाहुभ्याम्) आकर्षण आणि धारण शक्ती या दोन बाहुप्रमाणे आणि (पूष्ण:) प्राण्यांच्या (हस्ताभ्याम्) बल आणि पराक्रमाप्रमाणे (त्वा) आपणास मानतो (आपण आकाश, पृथ्वी व प्राणशक्ती यांचे माता असून आमचे मार्गदर्शक आहात) (आपण दाखविलेल्या पद्धतीने) (पृथिव्या:) भूमीच्या (सधस्थात्) एक स्थानाहून (दुसर्‍या स्थानास जाणार्‍या तसेच (पुरीष्यम्) पूर्ण सुखदायक, (ज्योतिष्मन्तम्) अतीव ज्योतिमान (अजस्रेण) निरंतर असणार्‍या (भानुमा) दीप्तीने (दीघतम्) अत्यंत प्रकाशमान असणार्‍या आणि (पुरीष्णम्) रक्षा करणार्‍या (अग्निम्) आणि वायूमध्ये विद्यमान असलेल्या विद्युतेला (अद्विरस्वत्) वायूप्रमाणे (खनामि) सिद्ध प्रकट मी (एक नागरिक) वा प्राप्त करीत आहे. (वैज्ञानिकांनी वायुमंडळात विद्यमान गुप्त अशा विजेला शोधून काढले. तिच्यापासून मी उपभोग घेत आहे) ज्याप्रमाणे (त्वा) तुमचा आश्रयात राहून आम्ही (नागरिक)(पृथिव्या:) अंतरिक्षाच्या (सधस्थात्) एका प्रदेशापासून (दुसर्‍यास्थानापर्यंत म्हणजे) (अड्गिरस्वत्) सूत्रात्म वायूप्रमाणे सर्वत्र विद्यमान (अहिसन्तम्) दु:ख वा ताडन न करणार्‍या (हानिकारक नसलेल्या) आणि (पुरीष्यम्) पालन करणार्‍या (अग्निम्) आणि वायूमध्ये विद्यमान असलेल्या विद्युतेला (अग्निरस्वत्) वायूप्रमाणे (खनामि) सिद्ध प्रकट मी ( एक नागरिक) वा प्राप्त करीत आहे. (वैज्ञानिकांनी वायुमंडळात विद्यमान गुप्त अशा विजेला शोधून काढले. तिच्यापासून मी उपभोग घेत आहे) ज्याप्रमाणे (त्वा) तुमचा आश्रयात राहून आम्ही (नागरिक) (पृथिव्या:) अंतरिक्षाच्या (सधस्थात्) एका प्रदेशापासून (दुसर्‍या स्थानापर्यंत म्हणजे) (अड्गिरस्वत्) सूत्रात्मवायूप्रमाणे सर्वत्र विद्यमान (अहिंसन्तम्) दु:ख वा ताडन न करणार्‍या (हानिकारक नसलेल्या आणि (परिष्यम्) पालन करणार्‍या सर्व पदार्थांमध्ये (अन्न, जल, वायू आदी) सर्वोत्तम अशा (शिवम्) मंगलकारी (अग्निम्) अग्नीला (प्रजाभ्य:) प्रजेसाठी (रवनाम:) प्रकट करतो (वायुमंडळात अदृश्य विद्युतशक्तीला दृश्य प्रकाशरुपात आणतो आणि संततीसाठी उपयोगात आणतो) आमच्याप्रमाणेच सर्व लोकांनी देखील असे करावे. ॥28॥
Essence
भावार्थ - जे राजपुरुष व प्रजाजन सर्वत्र विद्यमान विद्युतरुप अग्नी सर्व पदार्थांपासून अनेक साधन व उपसाधनांद्वारे प्रकट करून घेऊन त्याचा विविध कार्यात प्रयोग करतात, ते लोकच कल्याणकारी ऐश्वर्य प्राप्त करतात. तुम्ही सर्व लोकांनी हे चांगल्याप्रकारे जाणून व समजून घ्यावे की जगात कोणताही पदार्थ विद्युतेच्या व्याप्तीबाहेर नाही. (ज्यात विद्युतशक्ती नाही, अशा एकही पदार्थ नाही.) ॥28॥
Subject
मनुष्यांनी कोणत्या रीतीने व कोणत्या पदार्थापासून विद्युत ग्रहण करावी, पुढील मंत्रात याविषयी सांगितले आहे -