Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 11 / Mantra 27

83 Mantra
11/27
Devata- अग्निर्देवता Rishi- गृत्समद ऋषिः Chhand- पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
त्वम॑ग्ने॒ द्युभि॒स्त्वमा॑शुशु॒क्षणि॒स्त्वम॒द्भ्यस्त्वमश्म॑न॒स्परि॑। त्वं वने॑भ्य॒स्त्वमोष॑धीभ्य॒स्त्वं नृ॒णां नृ॑पते जायसे॒ शुचिः॑॥२७॥

त्वम्। अ॒ग्ने॒। द्युभि॒रिति॒ द्युऽभिः॑। त्वम्। आ॒शु॒शु॒क्षणिः॑। त्वम्। अ॒द्भ्य इत्य॒त्ऽभ्यः। त्वम्। अश्म॑नः। परि॑। त्वम्। वने॑भ्यः। त्वम्। ओष॑धीभ्यः। त्वम्। नृ॒णाम्। नृ॒प॒त॒ इति॑ नृऽपते। जा॒य॒से॒। शुचिः॑ ॥२७ ॥

Mantra without Swara
त्वमग्ने द्युभिस्त्वमाशुशुक्षणिस्त्वमद्भ्यस्त्वमश्मनस्परि । त्वँवनेभ्यस्त्वमोषधीभ्यस्त्वन्नृणां नृपते जायसे शुचिः ॥

त्वम्। अग्ने। द्युभिरिति द्युऽभिः। त्वम्। आशुशुक्षणिः। त्वम्। अद्भ्य इत्यत्ऽभ्यः। त्वम्। अश्मनः। परि। त्वम्। वनेभ्यः। त्वम्। ओषधीभ्यः। त्वम्। नृणाम्। नृपत इति नृऽपते। जायसे। शुचिः॥२७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (प्रजाजनांची उक्ती) हे (नृपते) जनांचे पालन करणार्‍या (अग्ने) अग्नीप्रमाणे तेजस्वी असलेल्या न्यायाधीश राजा, (त्वम्) आपण (द्युभि:) दिवसाप्रमाणे प्रकाशमान (कीर्तिमान) आणि न्याय आदीगुणांमुळे सूर्यासमान आहात (सूर्य सर्वांना सारखेपणाने प्रकाश देतो, तद्वत आपणही सर्वांना सारखेपणाने न्याय देता) (त्वम्) आपण (आशुशुक्षीण:) दृष्टांचा त्वरित नाश करणारे आहात. (त्वम्) आपण (अद्भ्य:) वायू अथवा जल (त्वम्) आपण (अश्वन:) मेध अथवा किरणांविषयीं (त्वम्) आपण (ओषधिभ्य:) सोमलता आदी औषधीविषयीं (त्वम्) आपण (नृणाम्) मनुष्यांमध्ये (प्रजाजनांमध्ये) (परि) सर्वप्रकारे (वरील कारणांमुळे) (शुधि:) पवित्र व (जायसे) प्रसिद्ध आहात (आपण ‘नृपति’ या नात्याने राज्याच्या वायू, जल, वृष्टी, वन, औषधी आदी क्षेत्रात जे कार्य केले आहे, त्यामुळे आपण प्रजेत प्रशंसनीय झाला आहात) यामुळे आपल्या आश्रमात राहून आम्ही प्रजाजनांनी देखील आपल्यासारखे व्हायला पाहिजे (या सर्वक्षेत्रात प्रजेने राजाला सहकार्य केले पाहिजे) ॥27॥
Essence
भावार्थ - जो राजा, सभासद अथवा प्रजाजन, सर्व पदार्थांपासून गुण ग्रहण करतो, विद्या आणि क्रिया (सिद्धांत आणि प्रयोग) द्वारे त्या गुणांचा लाभ घेतो, तोच धर्माचरणामुळे पवित्र व शीघ्रकारी होतो. तोच सर्व सुखांचा स्वामी होतो, याहून अन्य जे आळशी लोक आहेत, ते कदापि सुखी होऊ शकत नाहीत. ॥27॥
Subject
पुनश्च, तो सभाध्यक्ष कसा असावा, हा विषय पुढील मंत्रात वर्णित आहे -