Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 11 / Mantra 2

83 Mantra
11/2
Devata- सविता देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- शङ्कुमती गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
यु॒क्तेन॒ मन॑सा व॒यं दे॒वस्य॑ सवि॒तुः स॒वे। स्व॒र्ग्याय॒ शक्त्या॑॥२॥

यु॒क्तेन॑। मन॑सा। व॒यम्। दे॒वस्य॑। स॒वि॒तुः। स॒वे। स्व॒र्ग्या᳖येति॑ स्वः॒ऽग्या᳖य॒। शक्त्या॑ ॥२ ॥

Mantra without Swara
युक्तेन मनसा वयन्देवस्य सवितुः सवे । स्वर्ग्याय शक्त्या ॥

युक्तेन। मनसा। वयम्। देवस्य। सवितुः। सवे। स्वर्ग्यायेति स्वःऽग्याय। शक्त्या॥२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे योग आणि तत्त्वविद्या जाणून घेण्याची (वा शिकण्याची) इच्छा बाळगणाऱ्या लोकहो, ज्याप्रमाणे (वयम्) आम्ही योगी माणसें (युक्तेन) योगाभ्यास साध्य करून (मनसा) विज्ञान, (विशेष ज्ञान) आणि (शक्त्या) विशेष शक्ती प्राप्त करतो आणि (देवस्य) सर्वांना प्रेरणा देऊन जागृत करणार्‍या (सवितु:) समग्र संसाराची उत्पत्ती करणार्‍या ईश्वराच्या या (सवे) जगतरुप) ऐश्वर्यामध्ये (स्वर्गाय) अदिक सुख आणि अधिक प्रकाश (तुम्हां सामान्यजनांपेक्षा अधिक व विशेष सुख) प्राप्त करतो, तसे तुम्ही देखील करा (योग्सभ्यासाद्वारे तुम्हाला आमच्यासारखे सुख आणि ज्ञान प्राप्त करता येईल) ॥2॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जर मनुष्यांनी परमेश्वराने निर्मित या सुष्टीत योगाभ्यास आणि तत्त्वविद्या (आत्मा, परमात्म्याचे विशेष ज्ञान) यांचे यथाशक्ती सेवन केले, तर त्यांच्यात सुंदर आत्मज्ञानाचे प्रकाश उत्पन्न होईल) आणि योग व पदार्थ विद्येचा अभ्यास करून सर्व माणसे अवश्यमेव सिद्धी प्राप्त करतील ॥2॥
Subject
पुढील मंत्रात हाच विषय प्रतिपादित आहे -