Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 11 / Mantra 19

83 Mantra
11/19
Devata- अग्निर्देवता Rishi- मयोभूर्ऋषिः Chhand- निचृदनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
आ॒क्रम्य॑ वाजिन् पृथि॒वीम॒ग्निमि॑च्छ रु॒चा त्वम्। भूम्या॑ वृ॒त्वाय॑ नो ब्रूहि॒ यतः॒ खने॑म॒ तं व॒यम्॥१९॥

आ॒क्रम्येत्या॒ऽक्रम्य॑। वा॒जि॒न्। पृ॒थि॒वीम्। अ॒ग्निम्। इ॒च्छ॒। रु॒चा। त्वम्। भूम्याः॑। वृ॒त्वाय॑। नः॒। ब्रूहि॑। यतः॑। खने॑म। तम्। व॒यम् ॥१९ ॥

Mantra without Swara
आक्रम्य वाजिन्पृथिवीमग्निमिच्छ रुचा त्वम् । भूम्या वृक्त्वाय नो ब्रूहि यतः खनेम तँवयम् ॥

आक्रम्येत्याऽक्रम्य। वाजिन्। पृथिवीम्। अग्निम्। इच्छ। रुचा। त्वम्। भूम्याः। वृत्वाय। नः। ब्रूहि। यतः। खनेम। तम्। वयम्॥१९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (राज्यातील प्रजाजन वा राष्ट्रातील नागरिक राजा/राष्ट्राध्यक्षाला म्हणत आहेत) हे (वाजिन्) प्रशंसनीय ज्ञानसंपन्न सभापती विद्वान राजा, (त्वम्) आपण (रुचा) आपल्या इच्छेप्रमाणे (नियोजन व नीतीप्रमाणे) शत्रूंना (आक्रम्य) पादाक्रान्त करून (पृथिवीम्) पृथ्वीचे राज्य आणि (अग्निम्) विद्या यांची (इचल) इच्छा वा कामना करा (समस्त भूमीवर तुमचे राज्य होण्याच्या योजना करा) आणि त्या (भूम्या:) पृथ्वीवरील विशाल राज्यात (न:) आम्हाला (प्रजाजनांला) (वृत्वाय) स्वीकार करा (आम्हाला नागरिक होऊ द्या) तसेच आपण आमच्याकरिता (बृहि) भुगर्भ विद्या आणि अग्निविद्येचा उपदेश करा की (यत:) ज्यामुळे (वयम्) आम्ही (तम्) त्या विद्येत (रवनेम) प्रविष्ट होऊ (त्या विद्येत प्रवीण होऊ शकू) ॥19॥
Essence
भावार्थ - मनुष्यांना (राष्ट्रातील नागरिकांना) पाहिजे की त्यांनी भूगर्भविद्या आणि अग्निविद्येचे ज्ञान प्राप्त करून पृथ्वीवरील पदार्थांचे चांगल्याप्रकारे परीक्षण, करावे त्यांच्या गुणांचे ज्ञान संपादित करावे) आणि मोठ्या उत्साहाने सुवर्ण आदी धातू व रत्न प्राप्त करावेत. तसेच भूमी खणण्याच्या कामी निष्णात असा सेवक, कर्मचारी, श्रमिक आदीना या विद्येचा उपदेश द्यावा (त्यांना या कार्यात प्रशिक्षण द्यावे) ॥19॥
Subject
माणसाने मनुष्य-जन्म मिळाल्यानंतर आणि विद्या प्राप्त केल्यानंतर काय करावे, याविषयी -