Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 11 / Mantra 18

83 Mantra
11/18
Devata- अग्निर्देवता Rishi- मयोभूर्ऋषिः Chhand- निचृदनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
आ॒गत्य॑ वा॒ज्यध्वा॑न॒ꣳ सर्वा॒ मृधो॒ विधू॑नुते। अ॒ग्निꣳ स॒धस्थे॑ मह॒ति चक्षु॑षा॒ निचि॑कीषते॥१८॥

आ॒गत्येत्या॒ऽऽगत्य॑। वा॒जी। अध्वा॑नम्। सर्वाः॑। मृधः॑। वि। धू॒नु॒ते॒। अ॒ग्निम्। स॒धस्थ॒ इति॑ स॒धस्थे॑। म॒ह॒ति। चक्षु॑षा। नि। चि॒की॒ष॒ते॒ ॥१८ ॥

Mantra without Swara
आगत्य वाज्यध्वानँ सर्वा मृधो विधूनुते । अग्निँ सधस्थे महति चक्षुषा नि चिकीषते ॥

आगत्येत्याऽऽगत्य। वाजी। अध्वानम्। सर्वाः। मृधः। वि। धूनुते। अग्निम्। सधस्थ इति सधस्थे। महति। चक्षुषा। नि। चिकीषते॥१८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे राजा, ज्याप्रमाणे (वाजी) एक वेगवान घोडा (अध्यानम्) मार्गावर (आगत्य) येऊन (सर्वा:) सर्व (मृध:) युद्धांमध्ये (शत्रुपक्षाला आपल्या वेग व चापल्य आदी गुणांनी (विधुनुते) कंपायमान करतो आणि ज्याप्रमाणे एक गृहाश्रमी पुरुष (चक्षुषा) आपल्या नेत्रांनी (महति) महान व सुंदर (सधस्थे) स्थानात (अग्निम्) अग्नीचे (निचिकीषते) चयन करू इच्छितो (सर्व वाछित अथवा योग्य स्थानात महायज्ञ होत असलेला आपल्या दृष्टीने पाहू इच्छितो) त्याप्रमाणे हे राजा, आपण सर्व संग्रामामधे विजयी व्हा आणि घराघरात विद्यासपयज्ञाचा प्रसार करा. ॥18॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. गृहस्थीजनांना पाहिजे की त्यांनी घोड्याप्रमाणे वेगाने येण्या-जाण्याचे कौशल्य मिळवावे. आणि शत्रूंना जिंकून आग्नेयादी अस्त्र विद्या प्राप्त करून, तसेच (शत्रूच्या शक्तीच्या तुलनेत) आपल्या शक्ती व तयारीचा विचार करून तसेच आपल्यातील राग, द्वेषादी दोष शांत करून, अधर्मी शत्रूंना जिंकावे ॥18॥
Subject
आता सभाध्यक्ष राजाने कोणाप्रकारे काय करावे (कसे वागावे) याविषयी -