Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 11 / Mantra 17

83 Mantra
11/17
Devata- अग्निर्देवता Rishi- पुरोधा ऋषिः Chhand- निचृदार्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
अन्व॒ग्निरु॒षसा॒मग्र॑मख्य॒दन्वहा॑नि प्रथ॒मो जा॒तवे॑दाः। अनु॒ सूर्य॑स्य पुरु॒त्रा च॑ र॒श्मीननु॒ द्यावा॑पृथि॒वीऽआत॑तन्थ॥१७॥

अनु॑। अ॒ग्निः। उ॒षसा॑म्। अग्र॑म्। अ॒ख्य॒त्। अनु॑। अहा॑नि। प्र॒थ॒मः। जा॒तवे॑दा॒ इति॑ जा॒तऽवे॑दाः। अनु॑। सूर्य॑स्य। पु॒रु॒त्रेति॑ पुरु॒ऽत्रा। च॒। र॒श्मीन्। अनु॑। द्यावा॑पृथि॒वीऽइति॒ द्यावा॑पृथि॒वी। आ। त॒त॒न्थ॒ ॥१७ ॥

Mantra without Swara
अन्वग्निरुषसामग्रमख्यदन्वहानि प्रथमो जातवेदाः । अनु सूर्यस्य पुरुत्रा च रश्मीननु द्यावापृथिवीऽआततन्थ ॥

अनु। अग्निः। उषसाम्। अग्रम्। अख्यत्। अनु। अहानि। प्रथमः। जातवेदा इति जातऽवेदाः। अनु। सूर्यस्य। पुरुत्रेति पुरुऽत्रा। च। रश्मीन्। अनु। द्यावापृथिवीऽइति द्यावापृथिवी। आ। ततन्थ॥१७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्वान, ज्याप्रमाणे (प्रथम:) (जातवेदा:) उत्पन्न सर्व पदार्थांमधे सर्वांहून आधी विद्यमान असलेला (अग्नि:) अग्नी (उषसाम्) सूर्याला, (अग्रम्) उष:काळाला आणि (अहानि) दिवसाला क्रमाने प्रकाशित करतो, तसेच (सूर्य्यस्य) सूर्याच्या (अग्रम्) आधी (त्याच्या) पुरुत्रा) अनेक वा अत्याधिक (रश्मीन्) किरणांना (अन्वाततन्थ) विस्तारित करतो तसेच (द्यावापृथ्विवी) सूर्य आणि पृथ्वीलोकास प्रकाशित करतो (अग्नी सर्व पदार्थात आधीच विद्यमान आहे. तोच सूर्य, उष:काळ व दिनाच्या रुपाने प्रकट होतो) त्याप्रमाणे हे विद्वान, आपण विद्येचा प्रसार करा, सर्वांना योग्य आचरणाकडे प्रवृत्त करा. ॥17॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे सर्व पदार्थांत गुप्तपणे विद्यमान असलेला कारणरूप विद्युत अग्नी नंतर भौतिक अग्नी रुपात प्रकट होऊन क्रमाक्रमाने सूर्याला, उष:कालाला आणि दिवसाला उत्पन्न करून पृथ्वी आदी पदार्थांना प्रकाशित करतो, त्याचप्राणे विद्वज्जनांनाही पाहिजे की त्यांनी सर्व मनुष्यांना उत्कृष्ट शिक्षण देऊन, ब्रह्मचर्य, विद्या आणि धर्माचे अनुष्ठान करवावे आणि अशाप्रकारे सुस्वभाव (सद्गुण सद्व्य बहार) आदीचा सर्वत्र प्रसार करून सर्वांना ज्ञान व आनंदरुप प्रकाशाने प्रकाशित करावे. ॥17॥
Subject
विद्वज्जनांनी कोणाप्रमाणे काय करावे (कसे वागावे) याविषयी पुढील मंत्रात सांगितले आहे -