Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 11 / Mantra 14

83 Mantra
11/14
Devata- क्षत्रपतिर्देवता Rishi- शुनःशेप ऋषिः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
योगे॑योगे त॒वस्त॑रं॒ वाजे॑वाजे हवामहे। सखा॑य॒ऽइन्द्र॑मू॒तये॑॥१४॥

योगे॑योग॒ इति योगे॑ऽयोगे। त॒वस्त॑र॒मिति॑ त॒वःऽत॑रम्। वाजे॑वाज॒ इति॒ वाजे॑ऽवाजे। ह॒वा॒म॒हे॒। सखा॑यः। इन्द्र॑म्। ऊ॒तये॑ ॥१४ ॥

Mantra without Swara
योगेयोगे तवस्तरँवाजेवाजे हवामहे । सखायऽइन्द्रमूतये ॥

योगेयोग इति योगेऽयोगे। तवस्तरमिति तवःऽतरम्। वाजेवाज इति वाजेऽवाजे। हवामहे। सखायः। इन्द्रम्। ऊतये॥१४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (सुखाय:) परस्पराचे मित्र असलेल्या लोकहो, (आम्ही तुमचे मित्र तुम्हास सांगत आहोत की) ज्याप्रमाणे आम्ही (ऊतये) आमच्या रक्षण, (पोषण, धारण आदीसाठी) (योगेयोगे) ज्या वेळी (आवश्यकप्रसंगी) तसेच (वाजेवाजे) युद्धादींमध्ये (तवस्तरम्) अत्यंत शक्तिशाली आणि (इन्द्रम्) परमऐश्वर्यशाली राजाला (हवामहे) आवाहन करतो वा त्यास सम्मान देतो, त्याप्रमाणे तुम्ही (रक्षणाची अपेक्षा करणारे लोक देखील त्या राजाला आवाहन करीत जा. ॥14॥
Essence
भावार्थ - जे लोक एकमेकाचे मित्र होऊन (संकटकाळी) एकमेकाच्या रक्षणाकरिता अत्यंत बलवान मनुष्यास आपला राजा मानतात (व त्याच्या आदेशाप्रमाणे वागतात) ते सर्व विघ्न-भयापासून मुक्त राहून सुखी राहू शकतात (अन्य नव्हे) ॥14॥
Subject
प्रजाजनांनी कशाप्रकारच्या मनुष्यास राजा म्हणून मान्य करावे, (राजा कोणकोणत्या गुणांनी संपन्न असावा) याविषयी पुढील मंत्रात कथन केले आहे -