Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 11 / Mantra 13

83 Mantra
11/13
Devata- वाजी देवता Rishi- कुश्रिर्ऋषिः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
यु॒ञ्जाथा॒ रास॑भं यु॒वम॒स्मिन् यामे॑ वृषण्वसू। अ॒ग्निं भर॑न्तमस्म॒युम्॥१३॥

यु॒ञ्जाथा॑म्। रास॑भम्। यु॒वम्। अ॒स्मिन्। यामे॑। वृ॒ष॒ण्व॒सू॒ इति॑ वृषण्ऽवसू। अ॒ग्निम्। भर॑न्तम्। अ॒स्म॒युमित्य॑स्म॒ऽयुम् ॥१३ ॥

Mantra without Swara
युञ्जाथाँ रासभँयुवमस्मिन्यामे वृषण्वसू । अग्निम्भरन्तमस्मयुम् ॥

युञ्जाथाम्। रासभम्। युवम्। अस्मिन्। यामे। वृषण्वसू इति वृषण्ऽवसू। अग्निम्। भरन्तम्। अस्मयुमित्यस्मऽयुम्॥१३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - सूर्य आणि वायूप्रमाणे सुखाची वृष्टी करणार्‍या अथवा सुखातच निवास करणार्‍या हे शिल्पीजनहो (कारागीर, यांत्रिक, अभियंता आदी लोक हो) आणि त्यांचे स्वामीजनहो (कारखानदार व उद्योगपती), (युवम्) तुम्ही दोघे (अस्मिन्) या (यामे) यानामधे (रासभम्) जल आणि अग्नीच्या वेगगुणरुप अश्वाला जुपणारे आणि (अस्मुयुम्) आम्हा (नागरिकांना) त्या यानातून घेऊन जाणारे तसेच (भरन्तम्) आमचे धारण-पोषण करणारे व्हा. आणि त्यासाठी यानामध्ये (अग्निम्) भौतिक अग्नीचा आणि विद्युतरुप अग्नीचा (युज्जाथाम्) उपयोग करा. (राष्ट्रातील सर्वांसाठी विमानादी यानांची निर्मिती करा व त्यात अग्नी, जल, विद्युत या शक्तींचा कौशल्यपूर्ण उपयोग करा) ॥13॥
Essence
भावार्थ - जे लोक विमान आदी यानांत यंत्र, जल आणि अग्नीचा उपयोग करतात, तेच दुसर्‍या देशांचा प्रवास करण्यात (वा येणे-जाणे करिता) समर्थ होतात. ॥13॥
Subject
यानंतर पुढील मंत्रात हे सांगितले आहे की मनुष्यांनी कुठे कुठे कशाकशाचा संग्रह करावा.