Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 11 / Mantra 10

83 Mantra
11/10
Devata- सविता देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- भुरिगनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
अभ्रि॑रसि॒ नार्य॑सि॒ त्वया॑ व॒यम॒ग्निꣳ श॑केम॒ खनि॑तुꣳ स॒धस्थ॒ आ। जाग॑तेन॒ छन्द॑साङ्गिर॒स्वत्॥१०॥

अभ्रिः॑। अ॒सि॒। नारी॑। अ॒सि॒। त्वया॑। व॒यम्। अ॒ग्निम्। श॒के॒म॒। खनि॑तुम्। स॒धस्थ॒ इति॑ स॒धस्थे॑। आ। जाग॑तेन। छन्द॑सा। अ॒ङ्गि॒र॒स्वत् ॥१० ॥

Mantra without Swara
अभ्रिरसि नार्यसि त्वया वयमग्निँ शकेम खनितुँ सधस्थ आ जागतेन छन्दसाङ्गिरस्वत् ॥

अभ्रिः। असि। नारी। असि। त्वया। वयम्। अग्निम्। शकेम। खनितुम्। सधस्थ इति सधस्थे। आ। जागतेन। छन्दसा। अङ्गिरस्वत्॥१०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे शिल्पी (कारागीर वा यांत्रिक) (त्वया) तुझ्यासह (सघस्ये) एके ठिकाणी असणारे (तुला सहकार्य करणारे) (वयम्) आम्ही लोक (सामान्य नागरिक) (अभ्रि:) भूमी खणण्याच्या कामी येणारी साधने (खोरे, टिकाव आदी) की जी साधनें (नारी) विवाहित श्रेष्ठ स्त्रीप्रमाणे कार्य सिद्ध करणारीं (असि) आहेत, त्या साधनांनी कारीगर, शिल्पी आदी लोक भूगर्भविद्येचे ज्ञान प्राप्त करतात, त्या ज्ञानाद्वारे आणि (जागतेन) जगती मंत्रात सांगितल्याप्रमाणे (छन्दसा) सुखकारी स्वतंत्र साधनांनी (अड्गिस्वत्) प्राणसमान असलेल्या (अग्निम्) विद्युत आदी अग्नी (खनितुम्) खणण्यासाठी (आशकेम) सर्वप्रकारे समर्थ होऊ शकू, (खणणें, उचलणे, हटविणे, फेकणे, आदी क्रियांमध्ये विजेचा योग्य वापर होईल, यांत्रिकजनांनी अशा साधनांचे निर्माण करावे ॥10॥
Essence
भावार्थ - मनुष्यांसाठी उचित आहे की त्यांनी खणण्यासाठी उत्तम साधनांचा वापर करून भूगर्भास खणावे आणि अग्नीचा संयोग वा उपयोग करून सुवर्ण आदी (विविध धातू) पदार्थ प्राप्त व निर्माण करावेत, पण त्यापूर्वी भूगर्भविद्येचे उचित ज्ञान प्राप्त असणे व नंतरच ते (सुवर्णादी धातु-प्राप्ती व वस्तुनिर्मिती) कार्य करणे, हे निश्चित पणे लक्षात घ्यावे. ॥10॥
Subject
मनुष्यांनी भूमी आदींतून सुवर्ण आदी पदार्थांना कसे प्राप्त करावे, पुढील मंत्रात हा विषय सांगितला आहे -