Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 10 / Mantra 9

34 Mantra
10/9
Devata- प्रजापतिर्देवता Rishi- वरुण ऋषिः Chhand- भूरिक अष्टि, Swara- मध्यमः
Mantra with Swara
आ॒विर्म॑र्या॒ऽआवि॑त्तोऽअ॒ग्निर्गृ॒हप॑ति॒रावि॑त्त॒ऽइन्द्रो॑ वृ॒द्धश्र॑वा॒ऽआवि॑त्तौ मि॒त्रावरु॑णौ धृतव्र॑ता॒वावि॑त्तः पू॒षा वि॒श्ववे॑दा॒ऽआवि॑त्ते॒ द्यावा॑पृथि॒वी वि॒श्वश॑म्भुवा॒वावि॒त्तादि॑तिरु॒रुश॑र्मा॥९॥

आ॒विः। म॒र्य्याः॒। आवि॑त्त॒ इत्याऽवि॑त्तः। अ॒ग्निः। गृ॒हप॑ति॒रिति॑ गृ॒हऽप॑तिः। आवि॑त्त॒ इत्याऽवि॑त्तः। इन्द्रः॑। वृ॒द्धश्र॑वा॒ इति॑ वृ॒द्धऽश्र॑वाः। आवि॑त्ता॒वित्याऽवित्तौ। मि॒त्रावरु॑णौ। धृ॒तव्र॑ता॒विति॑ धृ॒तऽव्र॑तौ। आवि॑त्त॒ इत्याऽवि॑त्तः। पू॒षा। वि॒श्ववे॑दा॒ इति॑ वि॒श्वऽवे॑दाः। आवि॑त्ते॒ इत्याऽवि॑त्ते। द्यावा॑पृथि॒वीऽइति॒ द्यावा॑ऽपृथि॒वी। वि॒श्वश॑म्भुवा॒विति॑ वि॒श्वऽश॑म्भुवौ। आवि॒त्तेत्याऽवि॑त्ता। अदि॑तिः। उ॒रुश॒र्म्मेत्यु॒रुऽश॑र्म्मा ॥९॥

Mantra without Swara
आविर्मयाऽआवित्तोऽअग्निर्गृहपतिरावित्तऽइन्द्रो वृद्धश्रवाऽआवित्तौ मित्रावरुणौ धृतव्रतावावित्तः पूषा विश्ववेदाऽआवित्ते द्यावापृथिवी विश्वशम्भुवावावित्तादितिरुरुशर्मा ॥

आविः। मर्य्याः। आवित्त इत्याऽवित्तः। अग्निः। गृहपतिरिति गृहऽपतिः। आवित्त इत्याऽवित्तः। इन्द्रः। वृद्धश्रवा इति वृद्धऽश्रवाः। आवित्तावित्याऽवित्तौ। मित्रावरुणौ। धृतव्रताविति धृतऽव्रतौ। आवित्त इत्याऽवित्तः। पूषा। विश्ववेदा इति विश्वऽवेदाः। आवित्ते इत्याऽवित्ते। द्यावापृथिवीऽइति द्यावाऽपृथिवी। विश्वशम्भुवाविति विश्वऽशम्भुवौ। आवित्तेत्याऽवित्ता। अदितिः। उरुशर्म्मेत्युरुऽशर्म्मा॥९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (ईश्वर आदेश देत आहे) (मर्य्या:) हे मनुष्यांनो, तुम्ही (गृहपति:) गृहाचे पालन करणार्‍या (अग्नि:) अग्नीप्रमाणे तेजस्वी विद्वान पुरुषाला (अवि:) प्रकटपणे (निर्भयपणे) (आवित:) प्राप्त करा अथवा त्यास निश्चयाने जाणा (त्याच्याजवळ जाऊन त्याच्या कृण्ज्ञानाचा लाभ घ्या) (वृद्धश्रवा:) सर्वशास्त्रांचे ज्याने पूर्णपणे लक्ष देऊन श्रवण केले आहे, अशा (इन्द्र:) शत्रुसंहारक सेनापतीला (आवि:) प्रकटपणे (आवित:) प्राप्त व्हा वा जाणा (रक्षणासाठी त्याच्याकडे जा) (धृतव्रतौ) सत्य आदी व्रतांना धारण करणार्‍या (मित्रा वरूणौ) मित्र आणि श्रेष्ठ व्यक्तींना (आवि:) प्रकटपणे (अवितौ) प्राप्त करा वा त्यांना जाणा (त्यांच्याजवळ राहून त्यांच्या गुणा, कर्म स्वभावाची माहिती करून घ्या व तद्वत आचरण करा) तसेच (विश्वेवेदा:) सर्व औषधींचे ज्ञाता (पूषा) पोषणकर्ता वैद्याला (आवि:) प्रकटपणे (वा निस्संकोचपणे) (आरित्त:) प्राप्त करा. (विश्वशम्भुवौ) समस्त विश्वाला सुख देणार्‍या (द्यावापृथिवी) विद्युत आणि भूमीला (आवि:) प्रकटपणे (आवित्ते) जाणून घ्या (त्यांची शक्ती व रहस्य ओळखा) (उरूशर्म्मा) अत्यंत सुखकारक अशा (अदिति:) विद्वान मातेला (आवित्ता) प्राप्त व्हा. असे कराल, तरच तुम्हाला सर्व सुख प्राप्त होतील. ॥9॥
Essence
भावार्थ - माणसें जोपर्यंत श्रेष्ठ विद्वान, उत्तम विदुषीमाता आणि प्रसिद्ध पदार्थांचे विज्ञान या सर्वांना जाणून घेत नाहीत (त्यांपासून मिळणार्‍या लाभाचे ज्ञान मिळवीत नाहीत) तो पर्यंत ते सुखप्राप्ती आत्रण दु:खनिवृत्ती करण्यात यशस्वी होऊ शकत नाहीत. ॥9॥
Subject
मनुष्याकरिता हे हितकर आहे की त्यांनी स्वभाव चांगला ठेवावा आणि (आपल्या कल्याणासाठी) आप्त विद्वानांजवळ अवश्य जावे, याविषयी :-