Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 10 / Mantra 7

34 Mantra
10/7
Devata- वरुणो देवता Rishi- वरुण ऋषिः Chhand- विराट् आर्षी त्रिष्टुप्, Swara- धैवतः
Mantra with Swara
स॒ध॒मादो॑ द्यु॒म्निनी॒राप॑ऽए॒ताऽअना॑धृष्टाऽअप॒स्यो वसा॑नाः। प॒स्त्यासु चक्रे॒ वरु॑णः स॒धस्थ॑मपा शिशु॑र्मा॒तृत॑मास्व॒न्तः॥७॥

स॒ध॒माद॒ इति॑ सध॒ऽमादः॑। द्यु॒म्निनीः॑। आपः॑। ए॒ताः। अना॑धृष्टाः। अ॒प॒स्यः᳕। वसा॑नाः। प॒स्त्या᳖सु। च॒क्रे॒। वरु॑णः। स॒धस्थ॒मिति॑ स॒धऽस्थ॑म्। अ॒पाम्। शिशुः॑। मा॒तृत॑मा॒स्विति॑ मा॒तृऽत॑मासु। अ॒न्तरित्य॒न्तः ॥७॥

Mantra without Swara
सधमादो द्युम्निनीरापऽएताऽअनाधृष्टाऽअपस्यो वसानाः । पस्त्यासु चक्रे वरुणः सधस्थमपाँ शिशुर्मातृतमास्वन्तः ॥

सधमाद इति सधऽमादः। द्युम्निनीः। आपः। एताः। अनाधृष्टाः। अपस्यः। वसानाः। पस्त्यासु। चक्रे। वरुणः। सधस्थमिति सधऽस्थम्। अपाम्। शिशुः। मातृतमास्विति मातृऽतमासु। अन्तरित्यन्तः॥७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - जो (वरूण:) श्रेष्ठ राजा असेल, त्याने (एता:) (राज्यात) अशा ज्या विद्यावती उत्तम सुशिक्षित स्त्रिया असतील की ज्या (सधमाद:) सदैव प्रसन्न असणार्‍या असून (घुम्निनी:) प्रशंसनीय धन आणि कीर्तीने समृद्ध आहेत, ज्या (अनाधृष्टा:) कोणाचा धाक व कोणाकडून भय मानत नाहीत, ज्या (आप:) जलाप्रमाणे शीतल स्वभावाच्या आणि (वसाना:) वस्त्र आणि आभूषणांनी संपन्न आहेत, तसेच ज्या (पस्त्यासु) घराच्या (अपस्म:) व्यवस्थादी कामात कुशल आहेत, अशा चतुर आणि (अपाम्) विद्यावती स्त्रियांच्या (शिशु:) बालकाला (पुत्र वा पुत्रीला) (मातृतमासु) अत्यंत आदरणीय अशा उपमाता (दाई) च्या (अन्त:) जवळ (सधस्थम्) घराजवळ असलेल्या एका (स्थानात शिक्षणासाठी (व पालनासाठी) ठेवावे ॥7॥
Essence
भावार्थ - राजासाठी आवश्यक आहे की त्याने आपल्या राज्यातील सर्व स्त्रियांना विद्वान बनवावे आणि त्यांच्यापासून उत्पन्न बालकांना विद्यावान कुशल दाईच्या अधीन करावे. यामुळे कोणाचाही बालक विद्याहीन वा उत्तम शिक्षणापासून वंचित असा राहणार नाही आणि शिवाय त्या बालकाची माता निर्बल होणार नाही. ॥7॥
Subject
राजांसाठी आवश्यक आहे की त्यांनी प्रजाजनांतील सर्व बालकांना आणि आलप्या परिवारातील सर्व बालकांना ब्रह्मचर्य धारण करवीत विद्यावान आणि सुशिक्षित करावे, याविषयी -