Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 10 / Mantra 33

34 Mantra
10/33
Devata- अश्विनौ देवते Rishi- शुनःशेप ऋषिः Chhand- निचृत् अनुष्टुप्, Swara- गान्धारः
Mantra with Swara
यु॒वꣳ सु॒राम॑मश्विना॒ नमु॑चावासु॒रे सचा॑। वि॒पि॒पा॒ना शु॑भस्पती॒ऽइन्द्रं॒ कर्म॑स्वावतम्॥३३॥

यु॒वम्। सु॒राम॑म्। अ॒श्वि॒ना॒। नमु॑चौ। आ॒सु॒रे। सचा॑। वि॒पि॒पा॒नेति॑ विऽपि॒पा॒ना। शु॒भः॒। प॒ती॒ऽइति॑ पती। इन्द्र॑म्। कर्म॒स्विति॒ कर्म॑ऽसु। आ॒व॒त॒म् ॥३३॥

Mantra without Swara
वयँ सुराममश्विना नमुचावासुरे सचा । विपिपाना शुभस्पती इन्द्रङ्कर्मस्वावतम् ॥

युवम्। सुरामम्। अश्विना। नमुचौ। आसुरे। सचा। विपिपानेति विऽपिपाना। शुभः। पतीऽइति पती। इन्द्रम्। कर्मस्विति कर्मऽसु। आवतम्॥३३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (सचा) संयुक्त एकमेकाशी जोडलेले) अशा (विपिपाना) विविध राज्यांचे (अनेक लहान लहान राज्यांनी मिळून बनलेल्या एका विशाल राज्याचे वा राष्ट्राचे) रक्षक आणि (शुभ:) कल्याणकारी व्यवहाराचे (पती) पालन करणार्‍या (अश्विना) सूर्य आणि चंद्राप्रमाणे तेजस्वी, प्रकाशमान हे सभापती आणि हे सेनापती, (युवम्) तुम्ही दोघे (नमुची) आपले दुष्ट कर्म न सोडणार्‍या अशा दुष्टा^(कर्मसु) शेती आदी (व्यापार) कर्म करणार्‍या आणि (सुरामम्) त्या कार्यात उत्कृष्टपणे रममाण असणार्‍या (इन्द्रम्) परमैश्वर्यशाली धनिकाचे (वैश्याचे) सदा (आवतम्) रक्षण करा ॥33॥
Essence
भावार्थ - राजा याच हेतूसाठी असतो की त्याने दुष्टांपासून श्रेष्ठजनांची रक्षा करावी. राजाने रक्षण वा सुरक्षा प्रदान केल्याशिवाय कोणीही प्रयत्नशील व श्रमी मनुष्य आपल्या कार्यात निश्चिंत वा निर्विघ्न राहू शकत नाही. तसेच प्रजाजन जर अनुकूल नसतील, तर राजपुरुष (वा राज्यशासन) स्थिर राहू शकत नाही. यामुळे सर्व राजपुरुषांनी व प्रजाजनांनी वनातील सिंहाप्रमाणे (त्यांच्यातील मिळून कार्य करण्याची वृत्ती प्रमाणे एकमेकास सहकार्य करीत सदैव आनंदात रहावे. ॥33॥
Subject
सभापती आणि सेनापती यांनी प्रयत्नपूर्वक (लक्ष देऊन) वैश्यजनांचे रक्षण करावे, याविषयी -