Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 10 / Mantra 32

34 Mantra
10/32
Devata- अश्विनौ देवते Rishi- शुनःशेप ऋषिः Chhand- निचृत् ब्राह्मी त्रिष्टुप्, Swara- धैवतः
Mantra with Swara
कु॒विद॒ङ्ग यव॑मन्तो॒ यवं॑ चि॒द्यथा॒ दान्त्य॑नुपू॒र्वं वि॒यूय॑। इ॒हेहै॑षां कृणुहि॒ भोज॑नानि॒ ये ब॒र्हिषो॒ नम॑उक्तिं॒ यज॑न्ति। उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽस्य॒श्विभ्यां॑ त्वा॒ सर॑स्वत्यै॒ त्वेन्द्रा॑य त्वा सु॒त्राम्णे॑॥३२॥

कु॒वित्। अ॒ङ्ग। यव॑मन्त॒ इति॒ यव॑ऽमन्तः। यव॑म्। चि॒त्। यथा॑। दान्ति॑। अ॒नु॒पू॒र्वमित्य॑नुऽपूर्व॑म्। वि॒यूयेति॑ वि॒ऽयूय॑। इ॒हेहेती॒हऽइ॑ह। ए॒षा॒म्। कृ॒णु॒हि॒। भो॑जनानि। ये। ब॒र्हिषः॑। नम॑उक्ति॒मिति॒ नमः॑ऽउक्तिम्। यज॑न्ति। उ॒प॒या॒मगृ॑हीत इत्यु॑पयाम॒ऽगृ॑हीतः॒। अ॒सि॒। अ॒श्विभ्या॒मित्य॒श्विऽभ्या॑म्। त्वा॒। सर॑स्वत्यै। त्वा॒। इन्द्रा॑य। त्वा॒। सु॒त्राम्ण॒ इति॑ सु॒ऽत्राम्णे॑ ॥३२॥

Mantra without Swara
कुविदङ्ग यवमन्तो वयञ्चिद्यथा दान्त्यनुपूर्वं वियूय । इहेहैषाङ्कृणुहि भोजनानि ये बर्हिषोऽनमउक्तिँ यजन्ति उपयामगृहीतो स्यश्विभ्यान्त्वा सरस्वत्यै त्वेन्द्राय त्वा सुत्राम्णे ॥

कुवित्। अङ्ग। यवमन्त इति यवऽमन्तः। यवम्। चित्। यथा। दान्ति। अनुपूर्वमित्यनुऽपूर््वम्। वियूयेति विऽयूय। इहेहेतीहऽइह। एषाम्। कृणुहि। भोजनानि। ये। बर्हिषः। नमउक्तिमिति नमःऽउक्तिम्। यजन्ति। उपयामगृहीत इत्युपयामऽगृहीतः। असि। अश्विभ्यामित्यश्विऽभ्याम्। त्वा। सरस्वत्यै। त्वा। इन्द्राय। त्वा। सुत्राम्ण इति सुऽत्राम्णे॥३२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (प्रजाजनांची उक्ती) हे (अड्ग) ज्ञानवान राजा, (कुवित्) प्रभूत ऐश्वर्यसंपन्न असे आपण (अश्विभ्याम्) विद्या प्राप्त केलेल्या शिक्षकांसाठी (उपयामगृहीत:) ब्रह्मचर्य आदी नियमांचा स्वीकार केलेला (असि) आहे. (त्यांच्यासाठी आपण नियम केलेले असून आपणही त्या नियमांची बांधलेले आहात) यासाठी आम्ही (प्रजाजनांनी) (सरस्वत्यै) विद्यायुक्त सुसंस्कारित वाणीसाठी (त्वा) आपणाला आणि (इन्द्राय) उत्कृष्ट ऐश्वर्यप्राप्तीसाठी (त्वा) आपणाला तसेच (सुत्राम्णे) निर्भय अशा रक्षणासाठी (त्वा) आम्ही आपला स्वीकार केलेला आहे (विद्वज्जन आपणाकडून संस्कृत वाणीचा प्रचार उत्तम ऐश्वर्य आणि भयरहित वातावरणाची अपेक्षा करीत आहेत) आपण त्यांचा सत्कार करून भोजनादी द्या. (आपणाकडून दुसरी अपेक्षा अशी की) ज्याप्रमाणे (थवमन्त:) जय आदी धान्याची शेती करणारे कृषकगण (इहेह) या भूमीवर वा या कृषी-व्यवहारांमधे (यवम्) जन आदी धान्य (अनुपूर्वं) एकानंतर एक असे क्रमाने (दान्ति) कापतात आणि नंतर भुश्यापासून (चित्) देखील (यवम्) जवदाणे (वियूय) वेगळे करून त्याचे धान्याचे रक्षण करतात, तद्वत आपण सत्य-असत्याचा विचार करून या विद्वानांची रक्षा करा. ॥32॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा अलंकार आहे. (‘यथा’ हा उपमावाचक शब्द मंत्रात आहे) ज्याप्रमाणे शेतकरी यत्न श्रमादी करून भूमीपासून अनेक प्रकारचे फळे उत्पन्न करतात, ते त्यांचे रक्षण करून फळांचा उपयोग घेतात आणि असार जो भुसा असतो, तो फेकून देतात, तसेच जसे शेतकरी त्या धान्याचा उचित भाग राजाला देतात, त्याप्रमाणे राजा व राजपुरुषांनाही पाहिजे की त्यानी अत्यंत यत्नपूर्वक कृषकांचे रक्षण करावे, त्यांच्याशी न्यायाने वागावे आणि त्यांच्याद्वारे ऐश्वर्य-समृद्धी मिळवून सुपात्रांना दान करीत स्वत: देखील आनंदात रहावे. ॥32॥
Subject
राजाने आणि सभासदांनी कोणासाठी काय करावे, याविषयी -