Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 10 / Mantra 31

34 Mantra
10/31
Devata- क्षत्रपतिर्देवता Rishi- शुनःशेप ऋषिः Chhand- आर्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
अ॒श्विभ्यां॑ पच्यस्व॒ सर॑स्वत्यै पच्य॒स्वेन्द्रा॑य सु॒त्राम्णे॑ पच्यस्व। वा॒युःपू॒तः प॒वित्रे॑ण प्र॒त्यङ्क्सोमो॒ अति॑स्रुतः। इन्द्र॑स्य॒ युज्यः॒ सखा॑॥३१॥

अ॒श्विभ्या॒मित्य॒श्विऽभ्या॑म्। प॒च्य॒स्व॒। सर॑स्वत्यै। प॒च्य॒स्व॒। इन्द्रा॑य। सु॒त्राम्ण॒ इति॑ सु॒ऽत्राम्णे॑। प॒च्य॒स्व॒। वा॒युः। पू॒तः। प॒वित्रे॑ण। प्र॒त्यङ्। सोमः॑। अति॑स्रुत॒ इत्यति॑ऽस्रु॒तः। इन्द्र॑स्य। युज्यः॑। सखा॑ ॥३१॥

Mantra without Swara
अश्विभ्याम्पच्यस्व सरस्वत्यै पच्यस्वेन्द्राय सुत्राम्णे पच्यस्व । वायुः पूतः पवित्रेण प्रत्यङ्क्सोमो अतिस्रुतः । इन्द्रस्य युज्यः सखा ॥

अश्विभ्यामित्यश्विऽभ्याम्। पच्यस्व। सरस्वत्यै। पच्यस्व। इन्द्राय। सुत्राम्ण इति सुऽत्राम्णे। पच्यस्व। वायुः। पूतः। पवित्रेण। प्रत्यङ्। सोमः। अतिस्रुत इत्यतिऽस्रुतः। इन्द्रस्य। युज्यः। सखा॥३१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे राजपुरुषहो आणि प्रजाजनहो, तुम्ही (अश्विभ्याम्) सूर्य आणि चंद्राप्रमाणे अध्यापक व उपदेशक व्हा. (सर्वांना प्रकाश व प्रेरणा देणारे, शीतल स्वभाव व निर्मळ बुद्धी देणारे व्हा.) (पच्यस्व) शुद्धबुद्धीने संयुक्त व्हा. (सरस्वत्यै) उत्तम शिक्षा-संस्कार मुक्त वाणी बोलण्यासाठी (पच्यस्व) उघत व्हा. (सुत्राम्णे) चांगल्याप्रकारे रक्षण करणार्‍या (इन्द्राय) श्रेष्ठ ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी (पच्यस्व) पुरुषार्थ व परिश्रम करा. (पवित्रेण) शुद्ध धर्माच्या आचरणाने (वायु:) वायूप्रमाणे (पूत:) पवित्र व स्वच्छ व्हा. (प्रत्यड्) पूजा-सत्कार करण्यास योग्य आणि (सोम:) सद्गुणयुक्त ऐश्वर्याने संपन्न अशा (अतिसुत:) अत्यंत ज्ञानवान (इन्द्रस्थ) परमेश्वराचे (युज्य:) योभाग्यासाद्वारे (सखा) मित्र व्हा. (योगाभ्यास व योगाच्या अष्टांगांने त्यास जाणून घ्या) ॥31॥
Essence
भावार्थ - मनुष्यांना पाहिजे की त्यानी सत्यवादी, धर्मात्मा आणि आप्त (विश्वसनीय) अशा अध्यापकाकडून व उपदेशकाकडून उत्तम विद्या, शिक्षण प्राप्त करावे आणि शुद्धधर्माच्या आचरणाने आपल्या आत्म्यास पवित्र करून अष्टांगयोगाद्वारे ईश्वरोपासना करावी आणि श्रेष्ठ संपत्ती प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करून आपसात मैत्रीभाव ठेवून वागावे. ॥31॥
Subject
मनुष्याने कसे असावे, कसे वागावे, याविषयी -