Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 10 / Mantra 27

34 Mantra
10/27
Devata- यजमानो देवता Rishi- शुनःशेप ऋषिः Chhand- पिपीलिकामध्या विराट् गायत्री, Swara- षड्जः
Mantra with Swara
निष॑साद धृ॒तव्र॑तो॒ वरु॑णः प॒स्त्यास्वा। साम्रा॑ज्याय सु॒क्रतुः॑॥२७॥

नि॒। स॒सा॒द॒। धृ॒तव्र॑त॒ इति॑ धृ॒तऽव्र॑तः। वरु॑णः। प॒रत्या᳖सु। आ। साम्रा॑ज्या॒येति॑ साम्ऽरा॑ज्याय। सु॒क्रतु॒रि॒ति॑ सु॒ऽक्रतुः॑ ॥२७॥

Mantra without Swara
निषसाद घृतव्रतो वरुणः पस्त्यास्वा । साम्राज्याय सुक्रतुः ॥

नि। ससाद। धृतव्रत इति धृतऽव्रतः। वरुणः। परत्यासु। आ। साम्राज्यायेति साम्ऽराज्याय। सुक्रतुरिति सुऽक्रतुः॥२७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे राज्ञी (साम्राज्याची राणी), ज्याप्रमाणे तुमचा (धृतव्रत:) सत्याचरण आणि ब्रह्मचर्य आदी व्रतांचे पालन करणारा आणि (सुक्रतु:) सुंदर बुद्धीने क्रिया करणारा (वरूण:) श्रेष्ठ पती (साम्राज्याय) चक्रवर्ती राज्याच्या स्थापनेसाठी आणि त्या राज्याच्या सुव्यवस्थेसाठी (पस्त्यासु) न्यायगृहामधे (आ) निरंतर आणि (नि) नित्य (ससाद) बसून न्याय देत असतो, तसे तुम्ही देखील न्यायकारिणी व्हा. ॥27॥
Essence
भावार्थ - ज्याप्रमाणे चक्रवर्ती राजाने चक्रवर्ती राज्याच्या सुरक्षेसाठी न्यायासनावर विराजमान होऊन सर्व लोकांना योग्य तोच न्याय द्यावा, तद्वत राणीनेदेखील नित्यप्रति स्त्रियांच्या प्रकरणात न्यायदान केले पाहिजे. या विधानापासून हा अर्थसूचित होतो की पती जसा नीती, विद्या आणि धर्माने युक्त हवा, त्याच्या पत्नीने देखील तसेच असले पाहिजे. ॥27॥
Subject
राजाप्रमाणे राणीने देखील राजधर्माचे पालन केले पाहिजे याविषयी -