Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 10 / Mantra 24

34 Mantra
10/24
Devata- सूर्यो देवता Rishi- वामदेव ऋषिः Chhand- भूरिक आर्षी जगती, Swara- निषादः
Mantra with Swara
ह॒ꣳसः शु॑चि॒षद् वसु॑रन्तरिक्ष॒सद्धोता॑ वेदि॒षदति॑थिर्दुरोण॒सत्। नृ॒षद्व॑र॒सदृ॑त॒सद् व्यो॑म॒सद॒ब्जा गो॒जाऽऋ॑त॒जाऽअ॑द्रि॒जाऽऋ॒तं बृ॒हत्॥२४॥

ह॒ꣳसः। शु॒चि॒षत्। शु॒चि॒सदिति॑ शु॒चि॒ऽसत्। वसुः॑। अ॒न्त॒रि॒क्ष॒सदित्य॑न्तरिक्ष॒ऽसत्। होता॑। वे॒दि॒षत्। वे॒दि॒सदिति॑ वे॒दि॒ऽसत्। अति॑थिः। दु॒रो॒ण॒सदिति॑ दुरोण॒ऽसत्। नृ॒षत्। नृ॒सदिति॑ नृ॒ऽसत्। व॒र॒सदिति॑ वर॒ऽसत्। ऋ॒त॒सदित्यृ॑त॒ऽसत्। व्यो॒म॒सदिति॑ व्योम॒ऽसत्। अ॒ब्जा इत्य॒प्ऽजाः। गो॒जा इति॑ गो॒ऽजाः। ऋ॒त॒जा इत्यृ॑त॒ऽजाः। अ॒द्रि॒जा इत्य॑द्रि॒ऽजाः। ऋ॒तम्। बृ॒हत् ॥२४॥

Mantra without Swara
हँसः शुचिषद्वसुरन्तरिक्षसद्धोता वेदिषदतिथिर्दुरोणसत् । नृषद्वरसदृतसद्व्योमसदब्जा गोजाऽऋतजाऽअद्रिजा ऋतम्बृहत् ॥

हꣳसः। शुचिषत्। शुचिसदिति शुचिऽसत्। वसुः। अन्तरिक्षसदित्यन्तरिक्षऽसत्। होता। वेदिषत्। वेदिसदिति वेदिऽसत्। अतिथिः। दुरोणसदिति दुरोणऽसत्। नृषत्। नृसदिति नृऽसत्। वरसदिति वरऽसत्। ऋतसदित्यृतऽसत्। व्योमसदिति व्योमऽसत्। अब्जा इत्यप्ऽजाः। गोजा इति गोऽजाः। ऋतजा इत्यृतऽजाः। अद्रिजा इत्यद्रिऽजाः। ऋतम्। बृहत्॥२४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, तुम्हासाठी हे आवश्यक व उचित कर्म आहे की जो परमेश्वर (हंस:) सर्व पदार्थांना स्थूल करतो (सुक्ष्म कणादीद्वारे वस्तूंना आकार देतो) जो (शुचिषत्) पवित्र पदार्थांमध्ये स्थित वा व्याप्त आहे, जो (वसु:) स्वत: सर्वत्र सर्व पदार्थांत निवास करीत आहे आणि सर्वांना निवास, स्थानादी देतो, जो (अंन्तरिक्षसत्) अवकाशात व्यापक असून (होता) सर्व पदार्थ देतो, ग्रहण (धारण) करतो आणि प्रलय वा लीन करतो (जो निर्माता, धारणकर्ता व संहर्ता आहे) (त्याची तुम्ही उपासना करावी.) तसेच जो परमेश्वर (वेदिषत्) पृथ्वीमधे व्यापक असून (अतिथि:) अतिथिप्रमाणे सत्कार करण्यास योग्य आहे, जो (दुरोणसत्) घरांमधे (नृषत्) मनुष्यात आणि (वरसत्) उत्तम पदार्थांत वास करून आहे, (तुम्ही त्याची उपासना करा). जो परमेश्वर (ऋतसत्) प्रकृती आदी नामधारक कारणांत स्थित असून (व्योमसत्) शून्यात वा अवकाशात राहतो, जो (अब्जा:) जलाचा उत्पत्तिकर्ता, (गोजा:) पृथ्वी आदी तत्त्वांचा उत्पत्तिकर्ता, (ऋतजा:) सत्यविद्यापूरित वेदांचा प्रकट करणारा आणि (अद्रिजा:) मेघ, पर्वत, वृक्ष आदींचा रचविता आहे, जो (ऋतम्) सत्यस्वरूप असून (बृहत्) सर्वांहून महान आणि अनंत आहे, तुम्हा त्या परमेश्वराची उपासना करा (अन्य कोणाची नको) ॥24॥
Essence
भावार्थ - मनुष्यांकरिता हे उचित आहे की त्यानी सर्वत्र व्यापक आणि पदार्थांची शुद्धी करणार्‍या ब्रह्म परमेश्वराचीच उपासना करावी. कारण त्याची उपासना केल्याशिवाय कोणालाही धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, यांद्वारे प्राप्त होणारे पूर्ण सुख कदापि मिळू शकत नाही. ॥24॥
Subject
मनुष्यांनी ईश्वराची उपासना करावी, त्याचबरोबर सर्वांसाठी न्याय करावा आणि सर्वांना चांगले ज्ञान द्यावे, याविषयी -