Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 10 / Mantra 21

34 Mantra
10/21
Devata- इन्द्रो देवता Rishi- देवावात ऋषिः Chhand- भूरिक ब्राह्मी बृहती, Swara- मध्यमः
Mantra with Swara
इन्द्र॑स्य॒ वज्रो॑ऽसि मि॒त्रावरु॑णयोस्त्वा प्रशा॒स्त्रोः प्र॒शिषा॑ युनज्मि। अव्य॑थायै त्वा स्व॒धायै॒ त्वाऽरि॑ष्टो॒ अर्जु॑नो म॒रुतां॑ प्रस॒वेन॑ ज॒यापा॑म॒ मन॑सा॒ समि॑न्द्रि॒येण॑॥२१॥

इन्द्र॑स्य। वज्रः॑। अ॒सि॒। मि॒त्रावरु॑णयोः। त्वा॒। प्र॒शा॒स्त्रो॑रिति॑ प्रऽशा॒स्त्रोः। प्र॒शिषेति॑ प्र॒ऽशिषा॑। यु॒न॒ज्मि॒। अव्य॑थाय। त्वा॒। स्व॒धायै॑। त्वा॒। अरि॒ष्टः॑। अर्जु॑नः। म॒रुता॑म्। प्र॒स॒वेनेति॑ प्रऽस॒वेन॑। ज॒य॒। आपा॑म। मन॑सा। सम्। इ॒न्द्रि॒येण॑ ॥२१॥

Mantra without Swara
इन्द्रस्य वज्रोसि मित्रावरुणयोस्त्वा प्रशास्त्रोः प्रशिषा युनज्मि । अव्यथायै त्वा स्वधायै त्वारिष्टोऽअर्जुनो मरुताम्प्रसवेन जयापाम मनसा समिन्द्रियेण ॥

इन्द्रस्य। वज्रः। असि। मित्रावरुणयोः। त्वा। प्रशास्त्रोरिति प्रऽशास्त्रोः। प्रशिषेति प्रऽशिषा। युनज्मि। अव्यथाय। त्वा। स्वधायै। त्वा। अरिष्टः। अर्जुनः। मरुताम्। प्रसवेनेति प्रऽसवेन। जय। आपाम। मनसा। सम्। इन्द्रियेण॥२१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (विद्वानांचे वचन राजाप्रत) हे राजा, आपणास (अरिष्ट:) कोणाकडून मृत्यू वा पराजय येणे शक्य नाही (आपण अजेय आहात) (अर्जुन:) प्रशंसनीय सौन्दर्यवान आणि (इन्द्रस्य) परमैश्वर्यवान असून (वज्र:) शत्रूकरिता वज्राप्रमाणे (असि) आहात. अशा (त्वा) आपणाला (अव्यथायै) कोणतीही पीडा न होण्यासाठी तसेच (प्रशास्त्रो:) सर्वांना शिक्षण-ज्ञान देणार्‍या विद्येने (मित्रा वरूणयो:) राजसभा आणि सैन्येच्या स्वामीसाठी आवश्यक त्या गुणांनी मी (एकश्रेष्ठ विद्वान) (युनज्मि) संयुक्त करीत आहे (आपण राजा आहात. राजासाठी सभेचे नियम आणि सैन्याच्या नियम-प्रबन्धादीची माहिती होणे आवश्यक आहे. मी ते आपणास सांगत आहे) (मरूताम्) ऋत्विजनांच्या (प्रसवेन) म्हणण्याप्रमाणे (स्वधायै) आपली विशेष वस्तु वा अधिकार जी राजनीती, त्या राजनीतीच्या सिद्धांतादी विषयी (त्वा) आपणासाठी योगाभ्यासाद्वारे चिंतन करीत आहे (मनसा) विचारशील मननाने तसेच (इन्द्रियेण) जीवाला प्राप्त इन्द्रियांद्वारे (त्वा) आपणास आम्ही (विद्वज्जन) (समापाम) प्राप्त होत आहोत ( विचार व दैहिकशक्ती आपणासाठी व्यय करीत आहोत) आपण (जय) दुष्टांना जिंकून निश्चिन्त व्हा, (अशी आमची इच्छा आहे) ॥21॥
Essence
भावार्थ - विद्वान लोकांसाठी आवश्यक आहे की त्यांनी धर्म आणि अर्थ यांच्या प्राप्तीकरिता राजा आणि प्रजा यांना सदा उत्तम ज्ञान (वा मार्गदर्शन) द्यावे. यामुळे ते कोणाला पीडीत करणार नाहीत आणि राजकारणाच्या विपरीत कार्य करणार नाहीत. तसेच विद्वज्जनांच्या मार्गदर्शनामुळे राजा व प्रजाजन बलवान होतील आणि राज्याच्या धनसंपदेची कदापि हानी वा नाश करणार नाहीत. ॥21॥
Subject
विद्वज्जनांनी काय करावे, हे पुढील मंत्रात सांगितले आहे -