Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 10 / Mantra 19

34 Mantra
10/19
Devata- प्रजापतिर्देवता Rishi- देवावात ऋषिः Chhand- विराट् ब्राह्मी त्रिष्टुप्, Swara- धैवतः
Mantra with Swara
प्र पर्व॑तस्य वृष॒भस्य॑ पृ॒ष्ठान्नाव॑श्चरन्ति स्व॒सिच॑ऽइया॒नाः। ताऽआव॑वृत्रन्नध॒रागुद॑क्ता॒ऽअहिं॑ बु॒ध्न्यमनु॒ रीय॑माणाः। विष्णो॑र्वि॒क्रम॑णमसि॒ विष्णो॒र्विक्रा॑न्तमसि॒ विष्णोः॑ क्रा॒न्तम॑सि॒॥१९॥

प्र। पर्व॑तस्य। वृ॒ष॒भस्य॑। पृ॒ष्ठात्। नावः॑। च॒र॒न्ति॒। स्व॒सिच॒ इति॑ स्व॒ऽसिचः॑। इया॒नाः। ताः। आ। अ॒व॒वृ॒त्र॒न्। अ॒ध॒राक्। उद॑क्ता॒ इत्युत्ऽअ॑क्ताः। अहि॑म्। बु॒ध्न्य᳖म्। अनु॑। रीय॑माणाः। विष्णोः॑। वि॒क्रम॑ण॒मिति॑ वि॒ऽक्रम॑णम्। अ॒सि॒। विष्णोः॑। विक्रा॑न्त॒मिति॒ विऽक्रा॑न्तम्। अ॒सि॒। विष्णोः॑। क्रा॒न्तम्। अ॒सि॒ ॥१९॥

Mantra without Swara
प्र पर्वतस्य वृषभस्य पृष्ठान्नावश्चरन्ति स्वसिचऽइयानाः । ताऽआववृत्रन्नधरागुदक्ता अहिम्बुध्न्यमनु रीयमाणाः । विष्णोर्विकर्मणमसि विष्णोर्विक्रान्तमसि विष्णोः क्रान्तमसि ॥

प्र। पर्वतस्य। वृषभस्य। पृष्ठात्। नावः। चरन्ति। स्वसिच इति स्वऽसिचः। इयानाः। ताः। आ। अववृत्रन्। अधराक्। उदक्ता इत्युत्ऽअक्ताः। अहिम्। बुध्न्यम्। अनु। रीयमाणाः। विष्णोः। विक्रमणमिति विऽक्रमणम्। असि। विष्णोः। विक्रान्तमिति विऽक्रान्तम्। असि। विष्णोः। क्रान्तम्। असि॥१९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (प्रजाजन राज्याच्या एका शिल्पी, कारागीर वैज्ञानिक, यांत्रिकजनास उद्देशून म्हणन आहेत) राजांचे हे शिल्पी, (अभियांत्रिकी कलेचे ज्ञाता व कारागीर) मनुष्या, तुम्ही (स्वसिच:) (असे मान तयार करा की) ज्यांना लोक आपल्या जनाने सिंचित करतात (पाण्याच्या वाफेवर चालणारी वाहनें बनवा) तसेच जे यान (इयाना:) चालत-चालत (उदक्ता:) पुन्हा आकाशात वर जातात. आणि जे (अहिबुध्न्यम्) अंतरिक्षात असणार्‍या मेघाच्या (अनुरीमयाणा:) मागे-मागे जातात तर कधी (नाव:) समुद्रात ज्याप्रमाणे नौका चालतात, त्याप्रमाणे (वृषमस्य) पाऊस करणार्‍या (पर्वतस्य) ढगाच्या (पृष्ठात्) वरच्या भागातून (प्रचरन्ति) जातात (वा उडतात) या यान-विमानादींमुळेच तुम्ही (शिल्पी, अभियांत्रिकजन) (विष्णो:) व्यापक ईश्वराच्या या जगात (विक्रमणम्) पराक्रमी (असि) झाला आहात तसेच (विष्णो:) व्यापक वायू मधून (विक्रान्तय्) अनेकप्रकारे गति करणारे आणि (विष्णो:) व्यापक विद्युतेप्रमाणे (क्रान्तम्) गतिचा आधार असणार्‍या विमानादीचे तुम्ही निर्माते (असि) आहात. तसेच (अधराक्) मेघाच्या खालून (आववृत्तन्) मेघाप्रमाणे उडतात. अशा यानाचा तुम्ही शोध लावा व निर्मिती करा (आकाशात मेघाच्या वरून वा खालून गति करणार्‍या, भूमीवरून वेग घेऊन आकाशात जाणार्‍या शत्रूवर पराक्रम गाजविण्यास समर्थ असणार्‍या वेगवान विमान आदी यानांची निर्मिती करा ॥19॥
Essence
भावार्थ - आकाशातील ढग ज्याप्रमाणे बरसतात आणि भूमीवर येऊन पुन्हा वाफेच्या रुपाने आकाशात जातात, पुन्हा तेच जल नद्यांत जाऊन नंतर समुद्रास मिळते, म्हणजे मेघाच्या आत, वर आणि खाली जल असते, कारागीर, (वैज्ञानिक व अभियंता) लोकांनी विमानादी यान आणि नौकांची निर्मिती करून भूमीवरून, जलावरून वा आकाशातून गती, प्रवास वा विहार करीत इच्छित देशांकडे यथेष्ट (वारंवार व जशी इच्छा होईल त्याप्रमाणे) जावे व यावे (विदेशगमन अवश्य करावे) जोपर्यंत अशा यान आदींचे निर्माण होत नाही, तोपर्यंत कोणीही द्वीप-द्वीपांतरापर्यंत जाऊ शकत नाही. ज्याप्रमाणे पक्षी स्वत:च्या शरीराला आकाशात घेऊन जातात व उडतात, त्याप्रमाणे कुशल कारागीर (वैमानिक) आदींना पाहिजे की त्यानी यानादीद्वारा आपले शरीर आकाशात न्यावेत (आकाशात विहार करावा) ॥19॥
Subject
यानंतर पुढील मंत्रात हा विषय सांगितला आहे की या जगात राजा आणि प्रजाजनांनी कोणत्या प्रकारच्या यान वाहन आदींची निर्मिती करावी -