Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 10 / Mantra 16

34 Mantra
10/16
Devata- क्षत्रपतिर्देवता Rishi- वरुण ऋषिः Chhand- स्वराट आर्षी जगती, Swara- निषादः
Mantra with Swara
हिर॑ण्यरूपाऽउ॒षसो॑ विरो॒कऽउ॒भावि॑न्द्रा॒ऽउदि॑थः॒ सूर्यश्च॑। आरो॑हतं वरुण मित्र॒ गर्त्तं॒ तत॑श्चक्षाथा॒मदि॑तिं॒ दितिं॑ च मि॒त्रोऽसि॒ वरु॑णोऽसि॥१६॥

हिर॑ण्यरूपा॒विति हिर॑ण्यऽरूपौ। उ॒षसः॑। वि॒रो॒क इति॑ विऽरो॒के। उ॒भौ। इ॒न्द्रौ॒। उत्। इ॒थः॒। सूर्यः॑। च॒। आ। रो॒ह॒त॒म्। व॒रु॒ण॒। मि॒त्र॒। गर्त्त॑म्। ततः॑। च॒क्षा॒था॒म्। अदि॑तिम् दिति॑म्। च॒। मि॒त्रः। अ॒सि॒। वरु॑णः। अ॒सि॒ ॥१६॥

Mantra without Swara
हिरण्यरूपाऽउषसो विरोकऽउभाविन्द्राऽउदिथः सूर्यश्च । आ रोहतँवरुण मित्र गर्तन्ततश्चक्षाथामदितिन्दितिञ्च मित्रो सि वरुणो सि ॥

हिरण्यरूपाविति हिरण्यऽरूपौ। उषसः। विरोक इति विऽरोके। उभौ। इन्द्रौ। उत्। इथः। सूर्यः। च। आ। रोहतम्। वरुण। मित्र। गर्त्तम्। ततः। चक्षाथाम्। अदितिम् दितिम्। च। मित्रः। असि। वरुणः। असि॥१६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे उपदेश करणारे ज्ञानी विद्वान महोदय, आपण (मित्र) सर्वांचे सुहृद असून (मित्र:) सुखदायक सहायक (असि) आहात. हे (वरूण) शत्रूंचा विनाश करणारे शक्तिशाली सेनापति महोदय, आपण (वरूण:) सर्वोन्तम (वीर) (असि) आहात. म्हणून आपण दोघे (गर्त्तम्) उपदेश ग्रहण करण्याची इच्छा असणार्‍या मनुष्याची घरी (आरोहतम्) जा आणि त्यास (अदितिम्) अविनाशी (च) आणि (दितिम्) नाशवान पदार्थांविषयी (च क्षाथाम्) सत्यज्ञान सांगा, (संसारात नित्य व अविनाशी तत्त्व काय आणि विनाशी तत्त्व काय, याविषयी सत्य उपदेश करा) हे (हिरण्यरुपौ) प्रकाश स्वरूप (उभौ) आपण दोघे (इन्द्रौ) परमैश्वर्य देणारे आणि (विरोके) विविध कार्यात रुची असणारे आहात. त्यामुळे जसे (सूर्य्य:) सूर्य आणि (च) चन्द्र (उषस:) प्रात:काळी आणि निशाकाळी सर्व पदार्थांना प्रकाशित करतात, त्याप्रमाणे तुम्ही दोघे (विद्वान व सेनापती (अज्ञानी लोकांना) (उदिथ:) विद्योपदेश करा. ॥16॥
Essence
भावार्थ - ज्या देशात उपदेशकगण आपल्या हितकारी भाषणांद्वारे अशाप्रकारे सर्वांसाठी विद्येचा प्रकाश फैलावतात की ज्याप्रमाणे सूर्य आणि चंद्र सर्वांसाठी समानरुपेण प्रकाश प्रसारित करतात, त्या देशात सत्य आणि असत्याचे विवेकज्ञान झाल्यामुळे कोणीही विद्याविहीन राहत नाही आणि भ्रम-संशयातही अडकत नाही. जेथे असे (उपदेशादी) होत नाहीत, तेथे अंधपरंपरेत अडकलेले लोक नित्य निरंतर क्लेश पावतात.॥16॥
Subject
विद्वानांसाठी आवश्यक आहे की त्यानी स्वत: निष्कपट असावे आणि अज्ञानी माणसांना सत्योपदेश करून त्यांना बुद्धिमान व विद्वान करावे, या विषयी -