Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 10 / Mantra 15

34 Mantra
10/15
Devata- मित्रावरुणौ देवते Rishi- वरुण ऋषिः Chhand- विराट् आर्ची पङ्क्ति, Swara- पञ्चमः
Mantra with Swara
सोम॑स्य॒ त्विषि॑रसि॒ तवे॑व मे॒ त्विषि॑र्भूयात्। मृ॒त्योः पा॒ह्योजो॑ऽसि॒ सहो॑ऽस्य॒मृत॑मसि॥१५॥

सोम॑स्य। त्विषिः॑। अ॒सि॒। तवे॒वेति॒ तव॑ऽइव। मे॒। त्विषिः॑। भू॒या॒त्। मृ॒त्योः। पा॒हि॒। ओजः॑। अ॒सि॒। सहः॒। अ॒सि॒। अ॒मृत॑म्। अ॒सि॒ ॥१५॥

Mantra without Swara
सोमस्य त्विषिरसि तवेव मे त्विषिर्भूयात् । मृत्योः पाह्योजोसि सहोस्यमृतमसि ॥

सोमस्य। त्विषिः। असि। तवेवेति तवऽइव। मे। त्विषिः। भूयात्। मृत्योः। पाहि। ओजः। असि। सहः। असि। अमृतम्। असि॥१५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (प्रजाजन विद्वानास उद्देशून) हे परम आप्त विद्वान, आपण ज्याप्रमाणे (सोमस्य) ऐश्वर्याचा (त्विंषि:) प्रकाण देणारे (विकास वा प्रसार करणारे) (असि) आहात, आणि (ओज:) पराक्रमी (असि) आहात, तद्वत मी देखील व्हावे (अशी माझी इच्छा आहे) (तवेव) तुमच्याप्रमाणे (मे) माझा (त्विषि:) विद्येच्या प्रकाशामुळे भाग्योदय (भूयात्) होवो, (असे मी इच्छितो) आपण मला (मृत्यो:) मृत्यूपासून (अकालमृत्यूपासून) (पाहि) वाचवा. ॥15॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यांनो, हे जाणून घ्या की जे एका धार्मिक विद्वानाला इष्ट वा प्रिय असते, त्याने अन्यजनांकरिता देखील तसेच इच्छावे. तसेच ज्याप्रमाणे प्रजाजनांनी राजपुरुषांचे रक्षण केले पाहिजे (वेळ पडल्यास हितकारी कार्यात राज-कर्मचार्‍यांना सहकार्य दिले पाहिजे) त्याचप्रमाणे राजपुरुषांनी (शासकीय कर्मचार्‍यांनी) प्रजाजनांचे निरंतर रक्षण केले पाहिजे. ॥15॥
Subject
राजा आणि प्रजाजन, यांना आवश्यक आहे की त्यांनी ईश्वराप्रमाणे न्यायाधीश होऊन परस्परांची रक्षा करावी, (न्याय्य कर्म व न्याय करीत एकमेकास साहाय्यकारी व्हावे) याविषयी -